Prostitution business under the name of art center : बीडच्या केज तालुक्यात चालू असणाऱ्या कला केंद्राच्या नावाखाली अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हे कला केंद्र चालवत असल्याचं समोर आल आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात रात्री उशिरापर्यंत चालणार्या एका कलाकेंद्रावर सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा मारला. यावेळी येथून काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांनी कलाकेंद्र चालकांसह काही ग्राहकांना देखील अटक केली आहे. रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांना या कलाकेंद्रात वापरलेले व न वापरलेले निरोधके देखील सापडले आहेत. त्यामुळे कला केंद्राच्या नावाखाली उबाठा गटाच्या जिल्हाप्रमुखाची वेगळीच कला चालत असल्याचे स्पष्ट झाल आहे.Prostitution business under the name of art center
दरम्यान याप्रकरणी पोलीसांनी एकूण 36 जणांवर गुन्हे नोंद केले आहेत. त्यात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांचा देखील समावेश असल्याने खळबळ माजली आहे.
केज तालुक्यातील उमरी येथील महालक्ष्मी कला केंद्र चालवले जाते. या कला केंद्रात वेश्या व्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी शुक्रवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास छापा टाकला असता या ठिकाणी अनेक रुममध्ये पार्टी नृत्य सुरू होते. त्यावेळी या ठिकाणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे हे त्या ठिकाणाहून पळून गेले. या ठिकाणी त्यांचा एक आयफोन पोलीसांना सापडला. तर ते वापरत असलेली स्कॉर्पिओ गाडी क्र. एमएच 23 झेड 0707 तसेच इनोव्हा गाडी क्र.44 वाय 7001 पत्र्याच्या शेडमध्ये पोलीसांना मिळून आली. रत्नाकर शिंदे हे संबंधीत थेअटर पार्टनरशिपमध्ये चालवत असल्याची बाब पोलीसांनी एफआयआरमध्ये नमूद केली आहे.
याशिवाय नृत्य कला केंद्रात नृत्य करणार्या एका मुलीकडे पोलीसांनी विचारपूस केली असता तिने आपले लैंगिक शोषन झाले असल्याचे पोलीसांना सांगितले. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पोलीस निरीक्षक एस.एस.धस यांनी या पीडितेचा जवाब नोंदवून घेतला आहे. सदर पीडिता ही अल्पवयीन आणि दलीत समाजाची आहे. हे माहिती असतानाही तिच्यावर दबाव टाकून हा प्रकार करवून घेतल्याचे पोलीसांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणी 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्व आरोपींवर कलम 188, 109, 114, 290, 34, 370(4), (5),370 (अ), 373, 376 (फ) (आय), भादंविसह कलम 4, 6, 17, 18, 21, बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 3,4,5,6,8,9 बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 75, 79 तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा (5) मुं.दा.का. कलम 65 (ई) प्रमाणे कायदेशीर फिर्याद देण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम