‘अडला हरी, गाढवाचे पाय धरी’ अशी प्रवाशांची अवस्था

0
17

द पॉईंट नाऊ ब्युरो ; गेल्या 15 दिवसांहून अधिक काळापासून एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आणि त्याचा फायदा उचलताय ते खाजगी वाहतूक करणारे वाहन धारक.

दिलेल्या या छायाचित्रामध्ये दिसणारं हे दृश्य अगदी बोलकं आहे. सोशल मीडियावर हे छायाचित्र व्हायरल होतंय. मात्र त्यात सत्यता देखील तितकीच आहे.

 

खाजगी वाहनांनीच घेतलीय महामंडळ बसची जागा

 

वेळेवर न मिळणारे वेतन, मिळणाऱ्या वेतनात देखील झालेली कपात, त्यामुळे बऱ्याच एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या, महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करण्याची मागणी यासाठी एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.

या संपाला सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.

मात्र अद्याप राज्य शासनाद्वारे कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय या कर्मचारी वर्गासाठी घेतला गेलेला नाही.

यामुळे प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. आणि याचा फायदा खाजगी वाहन चालक घेत आहेत.

‘अडला हरी, गाढवाचे पाय धरी’ या म्हणीची प्रचिती सध्या सगळीकडे येत आहे. एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे, प्रवासी वर्गाला पर्याय उरलेला नाही. आणि त्याचाच गैर फायदा खाजगी वाहन धारक निर्धास्त पणे घेत आहेत.

अक्षरशः जिथे 100 रुपये भाडे असेल, तिथे 300 आणि 400 रुपये भाडं हे खाजगी वाहन धारक प्रवाशांकडून लुबाडत आहेत.

त्यात गरज असल्या कारणाने प्रवासी देखील, नाविलाजास्तव या खाजगी वाहन धारकांच्या मुजोरीला बळी पडताय. आणि मागेल तितके भाडे अदा करून, आपलं इच्छित स्थळ गाठत आहेत.

प्रवासी वर्ग अर्थातच सामान्य नागरिक. या सामान्य नागरिकाला आधीच महागाईने पुरतं त्रस्त केलंय. आणि त्यात तापलेल्या तव्यावर हे खाजगी वाहन धारक आपली पोळी भाजून घेत आहेत.

एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तर शासन उदासीन आहेच. मात्र प्रवाशांची होणारी लुबाडणूक देखील, शासन नजरे आड करतंय.

खाजगी वाहन चालकांच्या या मुजोरीकडे देखील शासन स्पष्टपणे डोळेझाक करत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा जीव पुरता मेटा कुटीला आला आहे.

या चित्रात असणारा हा बोलकेपणा देखील शासनाला का टोचू नये? याचंच आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांचे आणि प्रवाशांचे होणारे हाल, याबाबत प्रशासन अजून ढिम्म का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आता या वाहन धारकांची मुजोरी कधी थांबणार? हा मोठा प्रश्न आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here