‘नरेंद्रांच्या’ हातावर ‘देवेंद्र’ काय आहे हा प्रकार वाचा सविस्तर

0
53

मुंबई प्रतिनिधी : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा ‘टॅटू’ काढला आहे.

आजपर्यंत अनेक सेलेब्रिटीचें टॅटू फॅन्स काढत असतात. पण आता चक्क राजकीय नेतेच आपल्या नेत्यांचे नाव गोंदवत आहे. यामुळे सध्या नरेंद्र पाटील आपल्या टॅटूमुळे चर्चेत आहेत. नरेंद्र पाटील यांनी आपल्या हातावर चक्क राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा टॅटू काढला आहे. ‘देवेंद्र’ असा टॅटू आपल्या मनगटावर काढला असून. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देत असल्याचं त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

‘आमच्या ह्रदयात तसेच ओठावर देवेंद्र आहेत. फक्त अधिकृतपणे आता टॅटू काढला आहे. ज्याच्या हातावर आणि ओठावर देवेंद्र आहे त्याने हातावर टॅटू काढला आहे.पाटणच्या दौऱ्यावर असताना मी हा टॅटू काढला,’ अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

मराठा समाज ते माथाडी कामगार सर्व्यांना न्याय देणारा माणूस म्हणजे फडणवीस. 2016 रोजी सर्वात प्रथम फडणवीसांकडे माथाडी कामगारांचे प्रश्न मांडले तेव्हापासून जिव्हाळा निर्माण झाला. आम्हाला विचारणारा मुख्यमंत्री मिळाला, आमचा घरातला माणूस असल्यासारख आम्हाला जाणवलं, त्यांनी प्राथमिकतेने ते प्रश्न सोडवले. मराठा आरक्षणातही फडणवीसांचा सिंहाचा वाटा आहे. मराठा नसतानाही मराठा समाजातील गरिबांसाठी स्नेह, प्रेम हे पाहिल्यानंतर महाराष्ट्राला हे नेतृत्व 10-15 वर्षांपूर्वी मिळालं असतं तर नक्कीच मराठा समाजाला न्याय मिळाला असता, असं पाटील म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here