Twitter : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मेटातर्फे थ्रेड्स अॅप लाँच करण्यात आले आहे. Meta ने 100 हून अधिक देशांमध्ये थ्रेड्स लाँच केले आहेत. थ्रेड्स भारतातही लाँच करण्यात आले आहेत. Android आणि iOS दोन्ही वापरकर्ते आता हे अॅप त्यांच्या स्मार्टफोनवर डाउनलोड करू शकतात. मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरला मेटाच्या थ्रेड्स अॅपकडून तगडी स्पर्धा मिळणार आहे. थ्रेड्स मेटाने स्टँडअलोन फॉरमॅटमध्ये लॉन्च केले आहेत परंतु तुम्ही इन्स्टाग्रामवर देखील लॉग इन करू शकता.
IND vs WI : क्रिकेट विश्वात मोठा बदल होण्याची शक्यता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात होणार?
Thredas लाँच झाल्याची माहिती देताना मार्क झुकरबर्गने सोशल मीडिया अकाउंटवर फायर इमोजीसह पोस्ट केले आणि लिहिलं की लेट डू दिस. थ्रेड्समध्ये आपले स्वागत आहे. थ्रेड्सबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, आगामी काळात थ्रेड्स खूप लोकप्रिय होणार आहेत कारण ते इन्स्टाग्रामशी जोडलेले आहे, त्यामुळे यूजर्सची संख्या अचानक वाढू शकते.
तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही महिन्यांत ट्विटरमध्ये जे काही बदल झाले आहेत, त्यामुळे यूजर्स खूप नाराज आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांची आवड मेटा थ्रेड्सकडे जाऊ शकते. मेटा थ्रेड्स देखील जाहिरातींसाठी सर्वोत्तम असू शकतात, अशा परिस्थितीत आगामी काळात जाहिरातींचे हक्क ट्विटरवरूनही जाऊ शकतात.
Horoscope Today 06 July: मिथुन, कर्क, तूळ, मीन राशींसाठी नशीब चमकेल, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
असे करा मेटा थ्रेड्स डाउनलोड
- डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जावे लागेल.
- तुम्ही आयफोन यूजर असाल तर तुम्हाला अॅप स्टोअरवर जावे लागेल.
- अॅप स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला थ्रेड्स अॅप शोधून ते डाउनलोड करावे लागेल.
- अॅप इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा आणि इन्स्टाग्रामच्या मदतीने लॉग इन करू शकता.
- लॉगिन केल्यानंतर, तुम्ही थेट Instagram सह प्रोफाइल सेट करू शकता.
- तुम्ही तुमच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सना थ्रेडमध्ये फॉलो करू शकता.
- सेटअप पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही Twitter वर जितक्या सहजतेने ट्विट करतात ते इथेही करू शकाल.
- जर तुम्ही डेस्कटॉप वापरकर्ता असाल, तर तुम्ही Threads.net ला भेट देऊन त्याच्या डेस्कटॉप फॉरमॅटमध्ये देखील प्रवेश करू शकता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम