ग्रामपंचायत परवानगीविना देशी ‘जोमात’ ; अनेक संसार मात्र ‘कोमात’

0
46

– रामजी यशोद
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात देशी दारू दुकान थाटण्यात आलंय, याबाबत त्रस्त नागरिकांनी नुकतेच ग्रामपंचायतीला निवेदन सादर केले. असता ग्रामपंचायत तर्फे धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

इथे देशी दारू दुकान चालवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे का? असा सवाल त्रस्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पिलखोड येथे सरकारमान्य देशी दारू दुकान सुरू आहे.
मात्र या देशी दारूच्या दुकानामुळे गावातील तरुण मंडळी व्यसनाच्या आहारी जाऊन भरकटली जाऊ शकते, म्हणून गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
एक महिन्या पूर्वी सुरू झालेल्या या देशी दारूच्या दुकानासाठी सदर मालकाने कोणत्याही प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा ग्राम सभेचा ठराव घेतलेला नाही, म्हणून सरपंच प्रकाश राघो यशोद यांनी म्हटले आहे.

संबंधित दुकान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळच आहे. तसेच या देशी दारू दुकानामुळे गावातील तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन भरकटतील या उद्देशाने गावातील ग्रामस्थांनी या दुकानास पूर्णतः विरोध केला आहे.
याबाबत गावातील ग्रामस्थांनी 11 नोव्हेंबर रोजी निषेध नोंदवत ग्रामसेवक येवले, उपसरपंच, सदस्य यांना निवेदन सादर केले.

एकीकडे सरपंचच सदर दारू दुकान मालकाने ना हरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचे म्हणत असतांना, हे दारू दुकान सुरू झालेच कसे? हा प्रश्न उपस्थित होतो. की यात कोणाच काही सोयर सुतक आहे? असाही सवाल उपस्थित केला जातोय.

जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळीच लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आता याबाबत नेमका काय निर्णय होतो? देशी दारू दुकान सुरू राहणार की ग्रामस्थांची तक्रार मान्य होणार हे बघणे महत्वाचे आहे.


हे ही वाचा…

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागात भारत रत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला .

तालुक्यातील सर्वच जि प व माध्यमिक शाळेत गुरुवारी भारत रत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय शिक्षण साजरा करण्यात आला .

देवळा येथे कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव, केंद्र प्रमुख रावबा मोरे, वरीष्ठ सहाय्यक अमोल जाधव, कनिष्ठ सहाय्यक निशा देसले, शीतल महाजन उपस्थित होते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here