Amol kolhe : राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी आपल्या नऊ आमदारांसोबत मंत्रीपदाची शपथ घेतली आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते सामील झाले. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालेल आहे. यात आता शरद पवारांसोबत किती आणि अजित पवारांसोबत किती आमदार आहेत याचा खुलासा अजूनही झालेला नाही. दरम्यान रविवारी अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी हजर होते. या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे देखील हजर होते. मात्र त्यांनी आज पुन्हा पीछे मूड करत आपण शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलं आहे.
अमोल कोल्हे हे शिरूर मतदार संघाचे खासदार असून त्यांनी काल अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना त्या ठिकाणी उपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आपण त्यांच्यासोबत आहोत असं दाखवून दिलं होतं. मात्र आज त्यांनी ट्विट करून आपण शरद पवार साहेबांसोबत असल्याचं स्पष्ट केल आहे. स्वीट मध्ये अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे की, “जब दिल और दिमाग मे जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है….. पर दिल कभी नही। अस ट्विट केलं आहे.
दरम्यान दुपारी चार वाजता अजित पवार हे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तर अजित पवार हे तटकरे यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करणार असल्याचे देखील बोलल जात आहे. यामुळे आता सर्वसामान्य जनता आणि राजकीय नेते कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाल आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम