Nagpur : एकाच वेळी पाच मित्रांचा तलावात बुडून मृत्यू…

0
39

Nagpur : नागपूर जिल्ह्यात असलेल्या हिंगणा तालुक्यात मोहगाव या ठिकाणच्या झिल्पी तलावामध्ये बुडून पाच तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सध्या पावसाळ्याच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. यामुळे ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असल्याचे बघायला मिळत आहे. असेच रविवारी सायंकाळच्या सुमारास पूर्व नागपूर मधील सहा मित्र मोहगाव येथील झिल्पी तलावामध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेले असता त्यातील पाच तरुणांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. ऋषिकेश पराळे (21, पाटोडा नागपूर) राहुल मेश्राम (23, गिडडोबा मंदिर चौक पाटोदा) वैभव भागेश्वर वैद्य (24, भांडेवाडी रोड पारडी नागपूर) शंतनू अरमरकर (वय २३), नितीन नारायण कुंभारे (वय २१) हे सर्व या अपघातात मृत झाले असून हे तरुण पूर्व नागपूर भागातील रहिवासी होते, रविवारी सुट्टी असल्याने ऋषिकेश पराळे त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या तीन मित्रांसोबत हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावावर पार्टी करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी मौजमजा करत असताना तिघे टप्याटप्याने पाण्यात उतरले. हे चारही जण पोहत असताना त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले यावेळी काठावर असलेल्या दोघांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तलावात उतरत बुडत असलेल्या चारही जणांना मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यांचा ही यात जीव गेला. तर उर्वरित एका जण कार जवळ असल्याने त्याला काही कळायच्या आत पाचही जण तलावात बुडाले होते.

दरम्यान स्थानिक नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकरी रेखराम भोंडे, शंकर मोरे यांच्या मदतीने तलावात शोध मोहीम सुरू केली व रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पाचही मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. दरम्यान मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी हिंगण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

एकाच वेळी पाच मित्रांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पूर्व नागपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर या पाचही जणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान पावसाळ्याचे दिवस असल्याने नैसर्गिक ठिकाणांचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने लोक घरा बाहेर पडत असतात.मात्र अशावेळी पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरू नये व नैसर्गिक साधनसंपत्तीला धोका पोहोचेल असं कृत्य करू नये अस आवाहन नागपूर पोलिसांकडून करण्यात आला आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here