देवळा नगरपंचायतीच्या वतीने अग्निशमन दलाच्या वाहनाचे लोकार्पण

0
26
देवळा नगरपंचायतीच्या नूतन अग्निशमन दलाच्या वाहनाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उपस्थित आमदार डॉ राहुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, नगराध्यक्षा सुलभा आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर, जितेंद्र आहेर ,अतुल पवार आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : देवळा तालुका निर्मिती होऊन १ जुलै २०२३ रोजी २४ वर्ष पूर्ण झाले.२५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असतांना देवळा नगरपंचायतीस सुमारे १ कोटी रुपयांची अद्यायवत अशी अग्नीशमन वाहनाची भेट आमदार डाॕ.राहूल आहेर यांच्या प्रयत्नातून देण्यात आली .

देवळा नगरपंचायतीच्या नूतन अग्निशमन दलाच्या वाहनाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उपस्थित आमदार डॉ राहुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, नगराध्यक्षा सुलभा आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर, जितेंद्र आहेर ,अतुल पवार आदी (छाया – सोमनाथ जगताप )

लोकार्पण सोहळा आज शनिवारी( दि १) रोजी आमदार डॉ राहुल आहेर, भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
माजी मंत्री कै डॉ दौलतराव आहेर यांनी १ जुलै १९९९ रोजी देवळा तालुक्याची निर्मिती केली . तत्कालीन ग्रामपालिका असतांना अनेक सोयीसुविधांच्या अडचणी येत होत्या . तसेच तालुक्यातील कार्यालये असो इतर सुविधा ,निधी अभावी अनेक वर्ष रखडल्या . २५ व्या वर्षात तालुका पदार्पण करीत असतांना रौप्य महोत्सवी वर्षात जास्तीत जास्त निधी व सुविधा मिळाव्यात अशा अपेक्षा जनतेकडून करण्यात येत आहेत. यासाठी आमदार डॉ आहेर यांनी प्रयत्न करावेत. यापूर्वी ३० मार्च २००० साली तत्कालीन देवळा ग्रामपालिके समोर देवळा – कळवण रस्त्यावर टपरींना मोठ्या प्रमाणात आग लागली होती. त्याची दाहकता संपूर्ण तालुक्याने बघितली.

२४ वर्ष तालुका निर्मिती होऊन अग्निशमन वाहनाची मागणी होत होती. रौप्य महोत्सवी वर्षात ही मागणी पूर्ण होईल का ?. अशा अपेक्षेत जनता असतांना रौप्य महोत्सवी वर्षात पहिल्या दिवशी या वाहनाची भेट देवून शहरासह तालुक्यातील नागरीकांना दिलासा मिळाला असला तरी येत्या काळात भुमिगत गटारी, रस्ते, विजेचे प्रश्न, मार्गी लावण्याकामी भरीव निधी उपलब्ध करुन द्यावा ,अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
विठे्वाडी विकास संस्थेच्या नूतन व्हा चेअरमन पदी सुनंदा निकम यांची निवड
यावेळी नगराध्यक्षा सुलभा आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर, नगरसेविका भाग्यश्री पवार, ऐश्वर्या आहेर,माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर , भुषण गांगुर्डे, अश्विनी चौधरी, शीला आहेर, कैलास पवार, भारती आहेर, राखी भिलोरे, करण आहेर, रत्ना मेतकर, संजय आहेर, मनोज आहेर, सुनंदा आहेर, संतोष शिंदे ,हितेश आहेर ,मुख्याधिकारी शामकांत जाधव,माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार , हर्षद भामरे ,अशोक सुराणा ,योगेश वाघमारे, प्रदीप आहेर आदिंसह नगरपंचायतीचे कर्मचारी , नागरीक उपस्थित होते.
माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर यांनी प्रस्ताविक केले. आभार सुधाकर आहेर यांनी मानले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here