Buldhana :बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडाराजा या ठिकाणी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास खासगी बसचे टायर फुटून लागलेल्या आगीमध्ये जवळपास 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या बस अपघाताची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अमित शहा यांनी मृतांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. तर वारसांना पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देखील देखील दिले आहेत. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी फोन द्वारे संपर्क साधून घटनेची माहिती घेतली व अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींवर उपचार हे शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश दिले होते, दुर्घटनेची माहिती मिळताच महामार्गासाठी तैनात आपातकालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं यातील जखमी प्रवाशांना काढून उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडाच्या जवळ समृद्धी महामार्गावर विदर्भ एक्सप्रेस या खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट करून या घटनेत मृत झालेल्या प्रवासांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तरी या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या अपघाताप्रती दुःख व्यक्त केलं असून विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या घटनेत आठ जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जिल्हा तसेच पोलीस प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहोत तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली आहे.
अमित शहा म्हणाले की,
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील रस्ता अपघात हृदय द्रावक आहे या दुःखाच्या घडीमध्ये या भीषण अपघातात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. प्रशासनाकडून जखमींवर त्वरित उपचार केले जात असून जखमी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम