Jalgaon : सभेला उपस्थित रहा अन्यथा रेशन मिळणार नाही असा मेसेज पसरवणारा त्या नगरसेवकाच्या रेशन दुकानाचा परवाना निलंबित

0
21

Jalgaon : शासन आपल्या दारी उपक्रमांमध्ये उपस्थित न राहिल्यास पुढचे तीन महिने रेशन पाणी बंद होईल अशा आशयाचा गैरसमज पसरवणारा मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी जळगाव महानगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केला आहे.

एकीकडे सर्वसामान्यांचे संवाद गोड व्हावे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंदाचा शिधा हा रेशन कार्ड धारकांना देण्यात येतो. तर दर महिन्याला ठराविक धान्य रेशन दुकानात मार्फत सर्वसामान्यांच्या घरात जात असते त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळतो. मात्र जळगाव महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी थेट शासनाच्या नियमांनाच आव्हान दिलं, आणि शासन आपल्या दारी उपक्रमामध्ये उपस्थित राहिले नाही तर पुढचे तीन महिने रेशन मिळणार नाही अशा आशयाचा मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल केला. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नुकतेच शासन आपल्या दारी उपक्रमासाठी जळगावमध्ये दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येत असल्याने त्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला.

 

दारकुंडे यांनी हा मेसेज व्हायरल केल्यानं अनेकांची दिशाभूल झाली आणि नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी शासनाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा ठपका ठेवत जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट त्यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित केला आहे. त्यांच्या वार्ड क्रमांक नऊ मधील रेशनच्या दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तर जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईच सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here