Pandharpur : आषाढी एकादशी साठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. जवळपास दहा लाख वारकरी आणि भाविक भक्त झाले असून दरवर्षीप्रमाणे यंदाच्या शासकीय पूजेचे मानकरी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तसेच मानाचे मानकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे तीन वाजेच्या सुमारास विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली. विठ्ठल रुक्मिणी च्या भक्ती मध्ये तल्लीन होऊन देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो-हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करत पंढरपूर मध्ये दाखल झालेल्या भाविकांनी चंद्रभागेच्या तीरावर विठू नामाचा गजर सुरू केला आणि यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तीमय झाला होता.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या वाकडी येथील भाऊसाहेब मोहिनीराज काळे व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे यांना विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेचा मान यंदा प्राप्त झाला. एकादशीच्या दिवशी विठुरायाचे दर्शन व्हावं यासाठी सकाळी सहा वाजेपासून ते दर्शन रांगेत उभे होते गेल्या 30 आपण एकही वारी चुकवली नसल्याचे सांगितलं आहे. तसेच त्यांना मिळालेल्या शासकीय महापूजेच्या मानाचा आनंद व्यक्त केला.
विशेष म्हणजे या वर्षी पहिल्यांदाच विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक आणि भाऊसाहेब मोहिनीराज काळे व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे या मानाच्या वारकरी दांपत्याच्या हस्ते प्रथेनुसार पूजा पार पडली. तसेच महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांना तुळशीची माळ देऊन पूजा संपन्न केली. एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांदा शासकीय महापूजा केली आहे. महापूजा नंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री आणि मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला तर लाखो वारकरी आता विठुरायाचे मनमोहक रूप आपल्या डोळ्यात साठवून घेत आहेत मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा फौज फाटा देखील तैनात करण्यात आला आहे. तर ठीक ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सोय करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम