Kalwan : प्रतिपंढरपूर आषाढी एकादशीसाठी सज्ज

0
20

Kalwan : कळवण शहराचे आराध्य दैवत असलेल्या ऐतीहासिक नाशिक जिल्ह्यातील प्रती पंढरपूर  समजलं जाणारं श्री विठोबा महाराज मंदिरात आषाढी एकादशी निमिताने मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांच्या दर्शनासाठी बॅरिगेट्स लावण्यात येऊन मंदिर परिसरात वॉटरप्रूफ मंडप लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गुरुवार दिनांक २९ जून रोजी पहाटे महापूजा ,गीतापठन ,जिल्ह्यातील विविध भागातून येणाऱ्या दिंडीचे आगमन व स्वागत ,मान्यवराच्या हस्ते महाआरती ,महाप्रसाद वाटप ,भजन ,कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी  दिली .
    ‌
कळवण येथील गांधी चौकात शेकडो वर्षाची ऐतहासिक परंपरा असलेले श्री विठोबा महाराज मंदिराचा जिर्णोधार व प्राणप्रतिष्ठा फेब्रुवारी 2012 मध्ये झाली. कळवणकरांचे ग्रामदैवत असलेल्या श्री विठोबा महाराजाचे मंदिर भव्यदिव्य असावे अशी संकल्पना सन 2009 मध्ये पुढे आल्यानंतर ट्रस्टची स्थापना होवून ट्रस्ट ,शहरातील दानशूर ,विविध संस्था ,संघटना यांनी आर्थिक मदत दिल्याने पंढरपूरच्या धर्तीवर प्रतीपंढरपूर श्री विठोबा महाराज मंदिर कळवण शहराच्या वैभवात भर घालणारे असून अष्टकोनी गाभारा ,61 फुट पांडुरंग कळस ,ज्ञानेश्वर व नामदेव असे 31 फुट दोन कळस मंदिरावर आहे ,मुख्य कळसाला दीडशे ग्राम सोन्याचा मुलामा असून नामदेव महाराज पायरी ,महाद्वार ,कळवणचा राजा श्री गणेश मदिर ,अशी मंदिराची रचना श्री क्षेत्र पंढरपूर येथील सदगुरु सखाराम महाराज अमळनेरकर संस्थान यांनी विठ्ठल रुख्मिणीच्या स्वयंभू अशा घडीव पाषाणातील मूर्ती दिल्या आहेत. मुर्तीकरिता मुंबई येथून खास पद्धतीने सोन्या चांदीचे दागिने बनविण्यात आले असून अशा ऐताहासिक श्री विठोबा महाराज मंदिरात रोज विविध धार्मिक कार्यक्रम होत असल्याने मंदिराचे पावित्र्य कळवणकरांणी टिकून ठेवले आहे .नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी विठ्ठल भक्तांना पंढरपूर येथे आषाढी निमित्ताने जाणे शक्य होत नसल्याने जिल्ह्यातील हजारो भाविक श्री विठोबा महाराज मंदिरात नतमस्तक होतात.

 

आषाढी एकादशी निमित्ताने  गुरुवारी पहाटे ५ वाजता  ताकाटे परिवार हस्ते महापूजा  होणार आहे. सकाळी 9 ते 10 गीतापठण कार्यक्रम होणार आहे. दुपारी जिल्ह्यातून विविध भागातून दिंड्या येणार असून त्यांचे मंदिर परिसरात स्वागत  केले जाणार आहे.सायंकाळी 6 वाजता सामुदायिक हरिपाठ होणार आहे ,त्यानंतर रात्री ८ वा.प्रसिध्द कीर्तनकार हभप  नितीन महाराज मुडावदकर  यांच्या  कीर्तनाचा कार्यक्रम होणार असल्याने कळवण परिसरातील विठ्ठल भक्तांनी विविध धार्मिक कार्यक्रमाना उपस्थित राहावे असे आवाहन श्री विठोबा महाराज मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी केले आहे

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here