Accident : पेट्रोलपंप वर मोबाइल वापरण जीवावर बेतलं.!

0
51

फक्त राज्यातच नाही तर देशभरातील पेट्रोल पंपांवर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला पेट्रोल पंपावर मोबाईल वापरण्यास मनाई असल्याचे बोर्ड नेहमीच दिसतात. मात्र तरीही काही वाहनधारकांकडून पेट्रोल पंप परिसरात मोबाईल फोनचा सर्रासपणे वापर केला जातो, आणि यामुळे अनेक दुर्घटना घडल्या असल्याचे देखील अनेकदा समोर आल आहे.

असाच एक प्रकार नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर नुकताच घडला आहे. या ठिकाणी एक दुचाकी धारक गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला आणि कर्मचारी गाडीमध्ये पेट्रोल भरत असताना ग्राहकाच्या मोबाईलवर आलेला कॉल आग लागण्यास कारणीभूत ठरला आहे. या ठिकाणी हा दुचाकी स्वार मोबाईलवर आलेला कॉल उचलत असताना अचानकपणे पेट्रोल ने पेट घेतला आणि बघता बघता पेट्रोल पंपावर आग लागली.

या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत ही आग विझवली मात्र यात किती प्रमाणात नुकसान झालं आहे हे समोर आलं नाहीये पेट्रोल आणि डिझेल हे अतिशय ज्वलनशील पदार्थ असल्याने ते हाताळत असताना मोठ्या प्रमाणावर खबरदारी घ्यावी लागते. मात्र याकडे सर्वसामान्य नागरिकांकडून सर्रासपणे दुर्लक्ष केलं जातं, यामुळे याआधी देखील अशा अनेक घटना घडल्याच समोर आल आहे. पेट्रोल भरत असताना मोबाईलवर आलेला एक फोन कॉल आपल्याला किती महागात पडू शकतो हे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाल आहे. यामुळे पेट्रोल भरत असताना मोबाईल फोनचा वापर करणं, बिडी – सिगरेट पिण, ज्वलनशील पदार्थ पेट्रोल पंपच्या आवारात घेऊन जाणे टाळणं गरजेचं आहे. यामुळे फक्त आपलाच नाही तर त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here