रामजी यशोद
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात तळीरामांच्या सोयीसाठी देशी दारूचे दुकान थाटण्यात आले असून या दुकानाला नागरिकांनी प्रचंड विरोध केला आहे. ग्रामपंचायतीचे कुठलेही नाहरकत दाखला न घेता हे समाज बिघडवण्याचे कृत्य मालकाकडून करण्यात आल्याने नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
पिलखोड सारख्या वैचारिक गावाला दारूचा अड्डा बनवण्याचे पाप काही व्यक्ती करत असून याला आळा घालावा यासाठी आज ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतला धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांच्या मागण्या रास्त असून हे दारूचे दुकान कुणाच्या आशीर्वादाने थाटले गेले याचा शोध घेणे देखील महत्वाचे आहे.
गावातील महापुरुषांच्या पुतळ्यापासून नजीकच असलेलं हे मदिराचे दुकाननागरिकांना महिलांना त्रासदायक ठरत आहे. तळीरामांच्या आवडीचा विषय असला तरी अनेक संसार मात्र उध्वस्त होऊ शकता, तरुणाई व्यसनाधीन होऊ शकते यामुळे हे दुकान त्वरित बंद करावे यासाठी आज नागरिक थेट ग्रामपंचायत कार्यालयात गाठणार आहेत.
गावातील काही युवकांनी पुढाकार घेतला असून आज सर्व महिलावर्ग मोठ्या संख्येने ग्रामपंचायतला निवेदन देणार आहेत. यावर अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम