निंबोळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुनिता निकम

0
38
निंबोळा ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंच सुनिता निकम यांच्या निवडीचे स्वागत करताना ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदी...

देवळा : निंबोळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुनिता नितीन निकम यांची मंगळवारी (दि १३ )रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. निंबोळा ग्रामपंचायतीमध्ये पंधरा दिवसांत दोन वेळा उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

निंबोळा ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंच सुनिता निकम यांच्या निवडीचे स्वागत करताना ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदी…

मावळते उपसरपंच विनोद गरुड यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी ३१ मे रोजी भारती सावंत यांची निवड करण्यात आली होती.श्रीमती सावंत ह्या लोकनियुक्त सरपंच प्रदीप निकम यांच्या गटाच्या सदस्या आहेत .दरम्यान, मावळते उपसरपंच विनोद गरुड यांना अपात्र घोषित केल्याने विरोधी गटाकडे बहुमता इतकी सदस्य संख्या झाल्याने उपस्स्थित सदस्यांमधून मंगळवारी (दि १३ )रोजी सुनीता निकम यांची उपसरपंच पदी निवड केली.

पंधरा दिवसांत दोनदा उपसरपंच पदाची निवड घेण्यात येणारी जिल्यातील एकमेव निबोळा ग्रामपंचायत असल्याचे समजते . या नाट्यमय घडामोडीमुळे गावात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. माजी उपसरपंच विनोद गरुड यांना अपात्र घोषित केल्याने बाजार समितीचे संचालक दिलीप पाटील यांच्या गटाकडे बहुमत प्राप्त झाले आहे .

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय निकम, राजेंद्र अहिरे ,बापू तलवारे , बिबाबाई निकम , कमलबाई गांगुर्डे आदींसह बाजार समितीचे संचालक दिलीप पाटील , जवाहर दादा , पंडित भागचन्द ,गणेश पाटील , ग्रामसेवक अमोल खैरणार व ग्रामस्थ उपस्थित होते .

गेल्या ३१ मे रोजी निंबोळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भारती सावंत यांची माझ्या अध्यक्षतेखाली निवड केली असून, विरोधकांनी अशा पध्दतीने कटकारस्थान रचून बेकायदेशीर रित्या मंगळवारी दि १३ रोजी परत उपसरपंच पदाची नियुक्ती केली आहे .
लोकनियुक्त सरपंच , प्रदीप निकम ,निबोळा

निबोळा ग्रामपंचायतीच्या ३१ मी रोजी झालेली उपसरपंच पदाची निवडणूक बेकायदेशीर असून , उप सरपंच निवडणुकीबाबत ग्रामपंचातीच्या प्रोसोडींगमध्ये नोंद नाही .दि १३ जून रोजी झालेल्या उप सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सदस्यांना रीतसर अजेंठा पाठवुन झालेली प्रक्रिया प्रोसोडींगमध्ये घेतली गेली आहे . यामुळे उपसरपंच सुनिता निकम यांची निवड कायदेशीर आहे . तसा अहवाल आपण वरिष्ठाना पाठवला आहे.
– जयंत भामरे ,विस्तार अधिकारी ,पंचायत समिती ,देवळा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here