Panchaganga river cleaning : ते दाम्पत्य लग्नमंडपातून थेट गेले नदीपात्रात….

0
56

कोल्हापूर जिल्ह्याची जलवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीला सध्या प्रदूषणाने मोठ्या प्रमाणावर घेरलं आहे. नदीत मोठ्या प्रमाणावर पानवेली तयार झाल्यानं तसेच शहरातील इतर ठिकाणचे दूषित पाणी देखील नदीत मिसळले जात आहे. या पानवेली काढण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत पंचगंगा नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी एक चळवळ चालवली आहे. अशाच एका सामाजिक संस्थेतील कार्यकर्त्यांने आपलं लग्न होताच क्षणी आपल्या नववधूला सोबत घेऊन पंचगंगा नदीपात्रात जात पानवेली काढल्या आहेत.

माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे कृष्णा इंगळे हे गेल्या अनेक महिन्यांपासून माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून इचलकरंजी महापालिकेच्या सहकार्याने पंचगंगा केंदाळ मुक्तीसाठी झटत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह ठरल्याने कृष्णा या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र मोहिमेवर जाता आलं नाही याची हुरहुर कृष्णाला लागून राहिल्याने त्याने विवाह होताच आपल्या पत्नी शिवानी सोबत पानगंगा नदीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली आहे. 13 जूनला कृष्णा आणि शिवानी यांचा इचलकरंजी या ठिकाणी थाटामाटात विवाह पार पडला. यानंतर कृष्णाने आपल्या पत्नी शिवानीला पानगंगा प्रदूषण मुक्त मोहिमेची माहिती दिली आणि आपला मानस बोलून दाखवला, यावेळी शिवानीने देखील तात्काळ कृष्णाला होकार देत थेट पंचगंगा नदी गाठली. यावेळी दोघांनी नदीतील जलपर्णी काढत पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला.

मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात तयार झालेल्या पानवेली आणि अस्वच्छ पाणी यामुळे कोल्हापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्यामुळे अनेक आजारांना सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे यामुळे महापालिका प्रशासन सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवत आहे.यातच आपणही समाजाच देणं लागतो याच भान जपत कृष्णा आणि शिवानी यांनी राबवलेली स्वच्छता मोहीम सध्या जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या या उपक्रमाचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या मोहिमेत सहभागी होऊन पंचगंगा नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे अस आवाहन या दांपत्याकडून यावेळी करण्यात आल आहे.

सध्या शिवानी आणि कृष्णा यांनी आपल्या लग्न मंडपातून थेट पंचगंगा नदीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात सहभाग घेतला चा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

 

http://surl.li/ibbxw


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here