देवळा : उमराणे येथे मुंबई आग्रा महामार्गावर शासकीय गोदामातील रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहन देवळा पोलिसांना मिळून आल्याने दोन आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

जवळपास ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल देवळा पोलिसांनी जप्त केला असून या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे . याबात देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि , बुधवार दि १४ रोजी उमराणे ता देवळा येथील मुंबई आग्रा महामार्गावर ट्र्क क्रमांक एम एच १२/एफ सी ५८४४ मध्ये ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे सुमारे २४६ गोणी ( प्रत्येकी ५० किलो ) तांदूळ व ३७ हजार ५०० रुपये किमतीचे सुमारे ३० गोणी गहू ( प्रत्येकी ५० किलो) याप्रमाणे शासकीय गोदामातील गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे अवैध मार्गाने जाणारे वाहन देवळा पोलिसांना मिळून आले .
याबात देवळा येथील पुरवठा निरीक्षक ज्योती कपाले यांनी आरोपी विजय देवरे रा उमराणे ,मनमाड रोड व योगेश माणिक भामरे ( ३२) ट्र्क चालक रा खुंटेवाडी ता देवळा यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून ,गुन्हा दाखल करण्यात आला केली आहे . असा एकूण ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल देवळा पोलिसांनी जप्त केला आहे . अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे व सहकारी करीत आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम