UPSC Prelims Result 2023:केंद्रीय लोकसेवा आयोगाचा UPSC प्रीलिम्स निकाल जाहीर

0
36

UPSC Prelims Result 2023:  केंद्रीय लोकसेवा आयोगाने सोमवार 12 जून रोजी UPSC प्रीलिम्स निकाल 2023 जाहीर केला आहे. आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी 14,624 जणांची निवड केली आहे.

WTC: भारतीय संघाला दुहेरी फटका, फायनलमधील पराभवानंतर ICC ने कापली संपूर्ण मॅच फी, गिलला मोठा दंड, जाणून घ्या कारण

नागरी सेवा पूर्व परीक्षेला बसलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकतात.

UPSC CSE प्रिलिम्स लेखी परीक्षा 28 मे 2023 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. निवडलेल्या सर्व उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत बसावे लागेल. UPSC CSE मुख्य परीक्षा 15 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.

UPSC प्रिलिम्स निकाल 2023 कसा तपासायचा
सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
होम पेजवर उपलब्ध असलेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स रिझल्ट 2023 लिंकवर क्लिक करा.
एक नवीन PDF फाईल उघडेल जिथे उमेदवार त्यांचे निकाल पाहू शकतात.
पृष्ठ डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी आपल्याजवळ ठेवा.

निकालाशी संबंधित माहितीसाठी उमेदवार संघ लोकसेवा आयोग कॉम्प्लेक्स, धोलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली येथील परीक्षा हॉल इमारतीजवळील सुविधा केंद्राशी संपर्क साधू शकतात. किंवा उमेदवार दूरध्वनी क्र. ०११-२३३८५२७१, ०११-२३०९८५४३ किंवा ०११-२३३८११२५ वर सर्व कामकाजाच्या दिवसांत सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत चौकशी करता येईल.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here