सुराणा पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुराणा तर व्हा.चेअरमनपदी कानडे बिनविरोध

0
15
येथील सुराणा पतसंस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन प्रदीप सुराणा,व्हा .चेअरमन संजय कानडे यांचा सत्कार करताना संस्थापक अध्यक्ष डॉ रमनलाल सुराणा समवेत सहायक निंबधक सुजय पोटे व संचालक मंडळ आदी (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा : जिल्ह्यातील अग्रगण्य अशा श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी प्रदिप सुराणा यांची तर व्हा चेअरमन पदी संजय कानडे यांची निवड करण्यात आली. या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.

येथील सुराणा पतसंस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन प्रदीप सुराणा,व्हा .चेअरमन संजय कानडे यांचा सत्कार करताना संस्थापक अध्यक्ष डॉ रमनलाल सुराणा समवेत सहायक निंबधक सुजय पोटे व संचालक मंडळ आदी (छाया – सोमनाथ जगताप)

आज गुरुवारी दि ८ रोजी चेअरमन, व्हा चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी संस्थेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली .यावेळी चेअरमन पदी प्रदीप सुराणा यांची तर व्हा चेअरमन पदी संजय कानडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सहाय्य निबंधक सुजय पोटे व संस्थापक अध्यक्ष डॉ रमनलाल सुराणा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमणलाल सुराणा, संचालक सर्वश्री रमेश संकलेचा, राजेंद्र सुराणा, निलेश कांकरिया, मनोज ठोलीया, अशोक गुळेचा, सुनिल बुरड, संतोष लोढा, सुभाष सोनवणे, जनार्दन शिवदे, सुरेखा सुराणा, शोभा सूर्यवंशी ,व्यवस्थापक महेश जोशी आदींसह कर्मचारी उपस्थित होते. गेल्या २६ वर्षापासून संस्थेचे संचालक मंडळ प्रामाणिकपणे, निःस्वार्थपणे काम करीत असून कायम संस्थेचे हितच जोपासले आहे.

संस्थेने केवळ बँकिंग सुविधा न देता आपण ह्या समाजाचे काहीतरी देणे लागतो ह्या भावनेने कार्य केले आहे. नाशिक जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना तात्काळ २५०००/- ची आर्थिक मदत दिली जाते .असे अनेक उपक्रम संस्थेने राबविले आहे, यापुढेही संस्थेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ सभासदांना सेवा देण्यात, सामजिक उपक्रमात कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही चेअरमन प्रदीप सुराणा,व्हा .चेअरमन संजय कानडे यांनी दिली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here