Asia Cup: आशिया चषक 2023 स्थळावरून बराच काळ वाद सुरू होता. हा वाद थांबला नव्हता तोच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी सकाळी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेने अनेक चाहत्यांना धक्का बसू शकतो. वास्तविक मंडळाने आगामी स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. यासाठी 14 सदस्यीय मुख्य पथकाची निवड करण्यात आली आहे. यासोबतच बीसीसीआयने जारी केलेल्या पत्रकात त्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. भारतीय संघ साखळी टप्प्यात तीन सामने खेळणार आहे. त्यापैकी एक सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
India-Nepal:आम्हाला आमचे संबंध जपायचे आहेत नेपाळसोबतच्या संबंधांवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य
वास्तविक बीसीसीआयने पुरुषांच्या आशिया कपसाठी हा संघ जाहीर केलेला नाही. त्याऐवजी बोर्डाने महिला उदयोन्मुख आशिया चषक स्पर्धेसाठी भारत अ संघ आणि सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठी 14 खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघ 13 जूनपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. यादरम्यान 17 जून रोजी संघ पाकिस्तानविरुद्धही सामना खेळणार आहे.
टीम इंडियाचे स्पर्धेचे वेळापत्रक
भारत अ विरुद्ध हाँगकाँग – १३ जून २०२३
भारत अ विरुद्ध थायलंड अ – १५ जून २०२३
भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ – १७ जून २०२३
टीम इंडियाचा पूर्ण संघ
श्वेता सेहरावत (कर्णधार), सौम्या तिवारी (उपकर्णधार), त्रिशा गोंगडी, मुस्कान मलिक, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, उमा क्षेत्री (यष्टीरक्षक), ममता माडीवाला (यष्टीरक्षक), तीतास संधू, यशश्री एस, काश्वी गौतम , पार्श्वी चोप्रा, मन्नत कश्यप, बी अनुषा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम