देवळा : जिल्ह्यातील अग्रगण्य अशा श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बुधवार दि ३१ रोजी बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सुजय पोटे यांनी कामकाज बघितले.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे ; सर्वसाधारण गटातून संस्थेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष डॉ. रमणलाल सुराणा, प्रदिप सुराणा, रमेश संकलेचा, राजेंद्र सुराणा, निलेश कांकरिया, मनोज ठोलीया, अशोक गुळेचा, सुनिल बुरड, संतोष लोढा, अनुसूचित जाती/जमाती गटातून सुभाष सोनवणे, भटक्या विमुक्त जाती/जमाती प्रवर्गातून जनार्दन शिवदे, इतर मागास प्रवर्गातून संजय कानडे व महिला राखीव गटातून सुरेखा सुराणा, शोभा सूर्यवंशी यांची बिनविरोध झाली .
संस्थापक अध्यक्ष डॉ. रमणलाल सुराणा यांनी बिनविरोध निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी डॉ सुराणा म्हणाले की, गेल्या २६ वर्षापासून संस्थेचे संचालक मंडळ प्रामाणिकपणे, निःस्वार्थपणे काम करीत असून कायम संस्थेचे हितच जोपासले आहे. संस्थेने केवळ बँकिंग सुविधा न देता आपण ह्या समाजाचे काहीतरी देणे लागतो ह्या भावनेने कार्य केले आहे. नाशिक जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना तात्काळ २५०००/- ची आर्थिक मदत दिली जाते .
असे अनेक उपक्रम संस्थेने राबविले आहे, यापुढेही संस्थेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ सभासदांना सेवा देण्यात, सामजिक उपक्रमात कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही दिली. बिनविरोध निवडीनंतर संस्थेच्या सर्व सन्माननीय सभासद, संस्थेचे आधारस्तंभ, मार्गदर्शक व आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विजय सूर्यवंशी , आमदार डॉ राहुल आहेर यांचे डॉ सुराणा यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम