मटाने येथील आगीत लाखोंचे नुकसान; परीसरात आगीचे डोंब

0
9
देवळा नजीक मटाणे येथे भंगार गोदामला लागलेली आग तर दुसऱ्या छायाचित्रात आग विझवितांना अग्निशमन दलाचे जवान (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : तालुक्यातील मटाणे येथे आज बुधवार दि ३१ रोजी दुपारी साडे अकरा वाजता भंगार गोदामाला आग लागली लागली . यात सम्पूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी सापडे असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की , मटाणे येथील भिका नथु पवार यांचा भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय असून,त्यांचे देवळा येथे दुकान असून जमा करण्यात आलेल्या भंगारचे मटाणे ता देवळा येथे मोठे गोदाम आहे .ह्या गोदमला बुधवार दि ३१ रोजी दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली .या आगीने रौद्ररूप धारण केले .

देवळा नजीक मटाणे येथे भंगार गोदामला लागलेली आग तर दुसऱ्या छायाचित्रात आग विझवितांना अग्निशमन दलाचे जवान छाया सोमनाथ जगताप

आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले . कडक उन्हामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही . आग विझविण्यासाठी सटाणा ,मालेगाव व मनमाड येथील नगरपरिषदेच्या अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले आहे. व स्थानिक पाण्याच्या ट्रँकरद्वारे आग विझवण्याचा प्रयन्त करण्यात आला .जवळपास चार बंब द्वारे उशिराने आग आटोक्यात आली .मात्र घटनास्थळी अग्निशमन बंब उशिरा आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी यात संपूर्ण भंगार गोदाम जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . या गोदामात पेपर रद्दी सह ,प्लस्टिक मटेरियल होते . आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर आकाशात धुराचे लोळ पसरले .

आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . घटनास्थळी तहसीलदार विजय सूर्यवंशी ,पोलिस निरीक्षक समीर बारवकर,गटविकास अधिकारी राजेश देशमुख आदींसह तलाठी ,ग्रामसेवक उपस्थित होते.तब्बल सहा ते सात चालल्या आगीमुळे गोदामातील सर्व भंगार बेची राख झाले .यामुळे गोदाम मालक भिका पवार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून,आगीचे कारण नेमके स्पष्ट झाले नसले तरी गोदाम नजीक असलेल्या बांधावरील गवत पटविण्यात आल्यामुळे सदर गोदामला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे .यावेळी नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून,तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी मालक पवार यांनी यावेळी केली .

दरम्यान , देवळा नगरपंचायतीकडे अग्निशमनाची सोय उपलब्ध नसल्याने तालुका वासियांनी नाराजी व्यक्त केली आहे. देवळा शहराची वाढती लोकसंख्या व उपनगरे लक्षात घेऊन अग्निशमन बंब आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. शहरात बंब उपलब्ध राहिला असता तर आजची आग लवकर आटोक्यात येऊन संभाव्य नुकसान टळले असते . अशी खंत यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here