
द पॉंईंट नाऊ प्रतिनिधी : भंडारा आणि अहमदनगर येथील रुग्णालयाला आग लागली आणि यात अनेक नागरिकांचा जीव गेला मात्र आता बऱ्याच लोकांना जाग येत असून फायर ऑडिट करून घ्या अन्यथा खासगी हॉस्पिटलची मान्यता रद्द केली जाईल असे पत्र बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी काढले आहे. पत्र काढले यात वाद नाही मात्र इतक्या लोकांचा जीव गेल्यावर तुम्हाला पत्र काढण्याची जाग येते हे आश्चर्यजनक आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात किती ठिकाणी रुग्णालयात आग लागली आणि त्यात किती नागरिकांचा होळपळून मृत्यू झाला आहे. मात्र तरी देखील आता तुम्ही फायर ऑडिट करा असे आदेश काढता यावरून हेच निदर्शनास येते कि जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत आम्ही सुधारणार नाही.
बीड जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटलने फायर ऑडिट करून घ्यावे, अन्यथा त्यांची मान्यता रद्द केली जाईल. अहमदनगर आणि भंडारा येथील अग्निकांडानंतर बीड जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. बीड मधील सर्व आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रॉनिक ऑडिट करायला सांगितले असून पुढील १० दिवसाची मुदत दिली आहे. अन्यथा कारवाई केली जाईल असे डॉ.सुरेश साबळे यांनी सांगितलंय. दोन दिवस बीड जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणण्यासाठीचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले आहे.
त्यामुळे आरोग्य विभागात सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे, डॉ.सुरेश साबळे यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील सर्व खासगी हॉस्पिटलचे देखील फायर ऑडिट महत्वाचे आहे. ते पूर्ण करून घेण्यासाठी १५ दिवसाची मुदत दिली आहे. अन्यथा हॉस्पिटलचे परवाने रद्द केले जातील व नूतनीकरण केले जाणार नाही. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम