द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा येथील मालेगाव नाका परिसरात सोमवारी (८) रोजी अडीच वाजेच्या सुमारास पाणीपुरीच्या (पकोडी सेंटर) गाडीवर असलेल्या गॅस सिलेंडरच्या नळीने अचानक पेट घेतल्याने एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे .
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , देवळा नाशिक मार्गावरील मालेगाव नाका परिसरात सोमवारी (दि ८) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शिवकृपा भेळ पकोडी सेंटरच्या गाडीवर असलेल्या सिलेंडरच्या नळीने अचानक पेट घेतला . यात पाणीपुरी पकोडी सेंटर गाडीचे नुकसान झाले असून, मालक श्रावण रामेश्वर साळवे (२४) हा किरकोळ जखमी झाला आहे . आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी मदत केल्याने पुढील अनर्थ टळला .
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत . मात्र या घटना भविष्यात घडणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. देवळा शहरात अशा शेकडो टपऱ्या असून यांत ‘फायर ऑडिट’ मात्र कधीही झालेले नाही याला जबाबदार नक्की कोण हे महत्वाचे आहे. शहरातील खवव्ये या गाड्यांवर जात असतात अशा वेळी सुरक्षेचे तीनतेरा प्रत्येक ठिकाणी दिसून येतात. भविष्यात अशा अडचणी निर्माण होणार नाही याची काळजी मात्र प्रशासनाने घेणे देखील गरजेचं आहे. वेळीच काळजी घेतली असती तर असे प्रकार मात्र टाळता आले असते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम