कंगना करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण

0
44

द पॉंईंट नाऊ प्रतिनिधी : बॉलिवूडची थलायवी आणि मणिकर्णिका कंगना रानौत आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाच्या निर्मितीत ती सध्या व्यस्त आहे. निर्मिती म्हणून कंगनाचा हा चित्रपट पहिला चित्रपट ठरणार आहे. कंगनाच्या या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री अवनीत कौर स्क्रीन शेअर करणार आहेत. या पोस्टर नुकतेच कंगनाने तिच्या इंष्टाग्रामवर शेअर केले आहे.

हा चित्रपट अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तनू वेड्स मनू या चित्रपटासारखाच हा चित्रपट आहे काय हे पाहणे थोडे औत्सुक्याचे ठरणार आहे कारण या चित्रपटाचे नाव मिळतेजुळते असल्याने हा प्रश्न येथे नक्कीच येईल. मात्र नावाजउद्दीन सिद्दीकी या चित्रपटात असल्याने चित्रपट नक्कीच दमदार असेल अशी आशा नक्कीच बाळगता येईल.

या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे, या चित्रपटाची निर्मिती मणिकर्णिका फिल्म द्वारे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक साई कबीर हे करत आहेत. कंगनाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. कंगनाची हा पहिलाच डिजिटल चित्रपट असणार असल्याची माहिती तिने दिली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here