सटाणा बस आगारात अचानक संप सुरू

0
40

द पॉईंट नाऊ ब्युरो ;  महाराष्ट्र भर एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांचा, संप चालू आहे. त्यात आता नाशिक जिल्ह्यातल्या, सटाणा बस आगाराच्या कर्मचाऱ्यांनी देखील , 7 नोव्हेंबर रोजी दुपारी अचानक संपास सुरुवात केली.

राज्यभरात एस. टी. महामंडळाच्या 59 हुन अधिक बस आगारांचा संप चालू आहे. काही बस आगार अद्याप सुरू होते. मात्र आज सटाणा येथील, बस आगराच्या कर्मचाऱ्यांनी देखील, अचानकच संपात सहभाग नोंदवल्याने, प्रवाशांचे मात्र अतोनात हाल झाले; अचानक पणे संपात सटाणा बस आगाराचे कर्मचारी सहभागी झाल्याने, प्रवाशांची मात्र पुरती हेळसांड झाली.

 

      एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसह, कर्मचारी संप करत आहेत. हाय कोर्टाने आदेश देऊनही बस आगाराचे कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. ऐन दिवाळीच्या काळातच एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांद्वारे संप पुकारला गेल्याने, प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

सटाणा येथे देखील आज अचानकच संपात सहभाग नोंदवला गेल्याने, प्रवासी जेरीस आले.
प्रवाशांच्या याच अडचणीचा फायदा उचलत प्रायव्हेट वाहन धारक मात्र, अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याने, प्रवाशांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली.

       नुकतेच वेळेवर वेतन न मिळण्याच्या समस्येमुळे, बऱ्याच एस. टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. कोरोनाच्या प्रकोपाने, एस. टी. महामंडळाला देखील मोठा फटका बसल्याने, त्याचे परिणाम महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना भोगावे लागले. आणि आता या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे, प्रवाशांना देखील, समस्येला सामोरे जावे लागत आहे.

एस. टी. महामंडळ द्वारे, नुकतीच भाडेवाढ देखील करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर देखील अद्याप महामंडळ कर्मचाऱ्यांचे प्रश्न निरुत्तरीतच आहेत.

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या असल्याने, सर्व नोकरदार वर्ग आपापल्या इच्छित स्थळी पोहोचण्याच्या लगबगीत, बस स्टॉप वर पोहोचले असतांना, आज अचानकच संपामुळे सर्वांचे हाल झाले.

यामुळे एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांच्या, या संपावर तोडगा कधी निघणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जोवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत प्रवाशांना मात्र ताटकळत राहावे लागेल, असेच संकेत दिसत आहेत


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here