Deola NCP: देवळा तालुक्यातील 221 पाणंद रस्त्यांना शासनाचा ग्रामीण मार्ग दर्जा मंजूर ; डॉ नूतन आहेर

0
44
देवळा येथे पत्रकार परिषदेत पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्ग दर्जा मिळाल्याची माहिती देतांना डॉ नूतन आहेर समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर आदी (छाया - सोमनाथ जगताप )

Deola Ncp : डिसेंबर २०२० पासून तालुक्यातील वाखारी गटातील पानंद रस्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वखर्चातून सर्वेक्षण केले. या अथक प्रयत्नाला यश मिळाले असून, या गटातील २२१ पानंद रस्त्यांना शासनाने ग्रामीण मार्ग दर्जा मंजूर केल्याची माहिती वाखारी गटातील जि प च्या माजी सदस्या डॉ नूतन आहेर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (Deola NCP )

यावेळी डॉ आहेर म्हणाल्या की, या गटातील सर्वात जास्त समस्या ही पाणंद रस्त्याची होती . यामुळे शेतकऱ्यांना आपला शेत माल बाजारात ने आण करणे तसेच शाळा , आरोग्य आदी समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यासाठी डिसेंबर २०२० पासून सदर रस्त्याची दुरुस्ती होण्यासाठी मी अनेक शासकीय कार्यालयात हेरझारे मारले. परंतु सदर रस्त्यांना ग्रामीण मार्ग दर्जा नसल्यामुळे त्यांना कुठूनही निधी उपलब्धतेची शास्वती मिळत नव्हती. (Deola NCP )

देवळा येथे पत्रकार परिषदेत पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्ग दर्जा मिळाल्याची माहिती देतांना डॉ नूतन आहेर समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर आदी (छाया – सोमनाथ जगताप )

वाखारी गटातील विजयनगर, वाखारी, खर्डे वाखारवाडी, कनकापुर, वरवंडी, मटाणे, वार्षी इत्यादी गावातील महत्त्वाचे १६ पानंद रस्त्यांचा वाद मिटवून स्वखर्चाने रस्ते दुरुस्त केले .रस्ते विकास योजना सन २००१ ते २०२१ अंतर्गत देवळा तालुक्यात १२६ ग्रामीण मार्ग अस्तित्वात आहे. त्यानंतर सेवानिवृत्त अधिकारी व महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ अधिकान्यांच्या मार्गदर्शनाने या गटातील २२१ मानंद रस्त्यांना ग्रामीण मार्ग दर्जा देनेबाबत दर्जीन्नती प्रस्ताव बनवायला सुरुवात केली. त्यासाठी पंचायत समितीच्या बांधकाम विभागा कडून परिपूर्ण प्रस्ताव तयार करून ते
जिल्हा परिषदकडे सादर केले. व जि प च्या ( दि ८ सप्टेंबर २०२१) रोजीच्या सर्वसाधारण सभेत त्याला मंजुरी घेतली .
जिल्हा परिषदच्या इतिहासात डॉ नूतन आहेर यांच्या विशेष प्रयत्नातुन एवढ्या मोठ्या प्रमाणात पानंद रस्त्यांना ग्रामीण मार्ग दर्जा मंजुरी देनेबाबत पहिलीच वेळ आहे. याचे मला मनस्वी समाधान लाभले . सदर प्रस्ताव जिल्हा परिषद नाशिक मार्फत (दि. २९ नोव्हेंबर २०२१) रोजी अधीक्षक अभियंता सार्वजनिक साधकाम विभाग यांचेकडे सादर केला. अधीक्षक अभियंतानी सदर प्रस्तावाला मंजुरी दिली.

सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागा कडे मंजुरीस्तव सादर केला. त्याला मुख्य अभियंता यांनी तत्काळ मंजुरी देऊन ( दि. १६ जून २०२२) रोजी तो शासनाकडे सादर केला. महाराष्ट्र शासनाकडून सदर प्रस्तावास मान्यता मिळाली असून ,याचा वाखारी गटातील सर्वसामान्य शेतकरी बांधवाना फायदा होणार आहे.

Murder – जायखेडा (बागलाण) येथे प्रियकरासह मिळून पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या

पानंद रस्त्यांना ग्रामीण मार्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे भविष्यात सदर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होण्यास मदत होईल. हे स्वप्न अखेर पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनिल आहेर यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. तालुक्यातील पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्ग दर्जा मिळाल्यामुळे विकासात मोठा हातभार लागणार असल्याची भावना यावेळी डॉ. नूतन आहेर यांनी व्यक्त केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here