Coyote Attack – मागील काही काळात पुणे शहर आणि परिसरात कोयता गॅंग (Gang) ने माजवलेल्या दहशतीचे लोन नाशिक (Nashik) शहरापर्यंत येऊन पोहोचले. आणि आता त्यात नाशिक शहरात कोयता गॅंग ने शाळकरी (School) मुलावरच हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि. 25 मार्च) घडली आहे.
पुणे शहर (Pune) आणि परिसरात कोयता गॅंग ने ठिकठिकाणी दहशत पसरवली आहे. त्यात पोलिसांनी कोयता गॅंगच्या बऱ्याच जणांना अटक करत कोयता गँगची दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही कोयता गॅंगने वर काढलेले डोके मागे हटलेले नाही.
नाशिक शहर आणि परिसरात देखील कोयता गॅंगची दहशत
नाशिक शहर (Nashik City) आणि परिसरात देखील काही दिवसांपूर्वी कोयता गॅंग ने दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. आणि आता हे कोयता गॅंग चे लोन शाळकरी मुलांपर्यंत जाऊन पोहोचले आहे.
नेमके काय झाले?
सध्या दहावीचे पेपर (10th Exam) सुरू आहेत. शहरातील दिंडोरी रोडवरील (Dindori Road) एका शाळेतून दहावी चे विदयार्थी आपला पेपर देऊन बाहेर घरी परतत होते. तेवढ्यात काही संशयितांनी हातात कोयता घेऊन यातील एका विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केले. यात विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत.
हल्ला का झाला?
काही दिवसांपूर्वी संशयित आणि शाळकरी मुलामध्ये वाद झाला होता. आणि याचाच राग मनात धरून या संशयितांनी शाळकरी मुलावर हल्ला केला. अशी माहिती जखमी झालेल्या शाळकरी मुलाने दिली आहे.
पालकांमध्ये भीतीचे वातावरण
दरम्यान, यामुळे शाळकरी मुलांच्या पालकांमध्ये (Parents) आपल्या पाल्यांच्या सुरक्षेबाबत धास्ती निर्माण झाली आहे. नाशिक शहरासह परिसरात वाढत्या गुन्हेगारीने नागरिक पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
Murder – जायखेडा (बागलाण) येथे प्रियकरासह मिळून पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या
वाढती गुन्हेगारी
नाशिक शहर आणि परिसरात वाढती गुन्हेगारी (Crime) हा चिंतेचा विषय बनली आहे. चोरी, हल्ला, खून अशा घटनांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. आणि त्यात आता शहरात कोयता गॅंग ने सुरू केलेली दहशत, यामुळे नागरिक भीतीच्या दवताखाली जगत आहेत. पोलिसांचा खाक्या अशा गुन्हेगारांवर का काही वचक बसवू शकत नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नाशिक शहरात मागील काही काळात झालेली गोळीबाराची घटना, चोऱ्या आणि आता कोयता गॅंगची दहशत, यामुळे नाशकात गुन्हेगारांच्या वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस कधी वचक बसवणार? याचीच नागरिक वाट पाहत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम