Deola Nagar Panchayat : देवळा नगरपंचायतीच्या वतीने रमाई घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नगराध्यक्षा सुलभा आहेर यांच्या हस्ते कार्यारंभ आदेश देण्यात आले . केंद्र व राज्य शासनाच्या वतीने घरकुल योजना राबविण्या येत असून , याचा स्वतःचे घर नाही अशा लोकांना मदत होत आहे . देवळा शहरातल्या गरजू लोकांना या योजनेच्या माध्यमातून याचा लाभ देण्यात येत आहे . (Deola Nagar Panchayat)
Deola Collage : राज्य बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी देवळा महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड
यातील रमाई घरकुल योजने अंतर्गत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना एका छोटेखानी कार्यक्रमात कार्यारंभ आदेश देण्यात आले . लाभार्थ्यांनी याकामी समाधान व्यक्त केले असून , घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू व्यक्तींनी नगरपंचात कार्यालयात संपर्क साधावा ,असे आवाहन नगराध्यक्षा सुलभा आहेर यांनी याप्रसंगी केले .
यावेळी गटनेते संजय आहेर ,माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर , नगरसेविका सुनंदा आहेर , ऐश्वर्या आहेर , करण आहेर , भूषण गांगुर्डे आदींसह मुख्याधिकारी शामकांत जाधव तसेच लाभार्थी उसस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम