ताहाराबादच्या गरजूंना मिळाला उबदार हात…!!

0
34

ताहाराबाद (रोहित गुरव) ;  थंडी वाजली की आपण आपोआप नवीन स्वेटर वगैरे विकत घेतो. मात्र रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या गरिबांना थंडीत कुडकूडतच राहावे लागते. मात्र अशाच गरजू, गरिबांना ताहाराबाद येथे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

ताहाराबाद येथील ‘Humanity and Helping Hand’ ग्रुप तर्फे रस्त्यावर झोपणाऱ्या गरीब, गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. या ग्रुप द्वारे एक प्रकारचा मायेच्या उबेचा ब्लॅंकेट रुपी हात त्यांच्या पाठीवरून फिरवण्यात आला.
या ग्रुप मधील तरुणांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फरसाण, मिठाई चे देखील वाटप या गरजूंना केले.

      नागरिकांकडून जुने कपडे घेऊन, ते गरजू लोकांना पुरविणे, मोफत जलसेवा अशा सेवा देखील पुरविल्याचे या ग्रुप मधील तरुणांनी सांगितले.
दिनेश साळवे, करण कांकरिया, वैभव गांगुर्डे, भूषण गांगुर्डे, सचिन तोटे, स्वामी गांगुर्डे, कल्पेश मानकर, रोहित मानकर, अमन खान, प्रतीक नहिरे, प्रथम साळवे अशी सारी या ग्रुप ची तरुणाई मिळून हे सामाजिक उपक्रम राबवत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here