Shivsena – शिंदेंनी आता अजून एक मोठा डाव साधलाय. शिंदेंनी आपला वेगळा गट स्थापन केल्यानंतर शिवसेना अन धनुष्यबाण चिन्ह देखील मिळवलं. अन त्याचसोबत ठाकरे गटाला देत असलेलं धक्कातंत्र अजूनही सुरूच आहे. (Shivsena)
Copper Wire Facts: बहुतेक विद्युत तारा फक्त तांब्यापासूनच का बनलेल्या असतात? कारण एक नाही, अनेक आहेत
शिंदेंच्या गटात आता ठाकरे गटातील मोठा मासा गळाला लागला आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय माजी केंद्रीय मंत्री सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत म्हणत शिंदेंचे बोट पकडले आहे. ठाकरे गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. Shivsena
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून फारकत घेत बाहेरचा रस्ता धरला, तेव्हापासून उद्धव ठाकरे मात्र एकटे पडत जातांना दिसत आहेत.
राज्यभरात आत्तापर्यंत ठाकरे गटातील शेकडो कार्यकर्ते आणि मोठमोठ्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्यात शिंदे यशस्वी झाले आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत अशा सर्वांनीच महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. मात्र त्याचा काही एक फायदा ठाकरे गटाला होतांना दिसत नाहीये.
महाराष्ट्रात स्थापन झालेला भाजप अन शिंदे गटाचा संसार अद्यापही लडखडत्या विटेवर उभा आहे. कारण अद्यापही याबाबत न्यायालयात केस सुरू आहे. मात्र शिंदे गटाकडे वाढता ओघ ठाकरे गटाची डोकेदुखी ठरू पाहत आहे.
आता ठाकरे यांचे सर्वात जवळचे सहकारी असलेले सुभाष देसाई यांचेच सुपुत्र भूषण यांनी शिंदे गटाचे बोट धरल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
वाऱ्याचा ओघ ज्या दिशेने असतो, त्याच दिशेला सारं काही आपला ओढा नेत असतं. असं म्हटलं जातं. आणि हे तेच तर नाही ना? असा प्रश्न पडू लागलाय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम