याचेही दर आता होणार कमी…!!!

0
30

द पॉईंट नाऊ ब्युरो ;कोरोनाच्या हाहाकारानंतर महागाईने देखील सामान्यांचं कंबरडं मोडलं होतं. त्यात आता इंधन दरांनंतर खाद्य तेलांबाबत देखील केंद्र सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतलाय.

इंधनाचे (Fuel) दर 110 च्या वर पोचले, तर खाद्य तेलाचे दर देखील 180 वर पोहोचून सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं होतं. मात्र आता केंद्र सरकारने खाद्य तेलांचे मूलभूत शुल्क अडीच टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर (0%) आणण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे सामान्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

      इंधनाचे दर नुकतेच 5 आणि 10 रुपयांनी केंद्र सरकारने कमी केले. आणि आता खाद्य तेलांचे देखील दर कमी होणार असल्याने सामान्यांसाठी ही निश्चितच सुखावह बाब आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here