द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : अभिनेत्री अथिया शेट्टीच्या २९ व्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटर केएल राहुलने इंस्टाग्रामवर प्रेमळ पोस्टद्वारे त्यांचे नाते अधिकृत केले. केएल राहुलने अथिया शेट्टीसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. चित्रात दोघेही कॉमेडी लूक करताना दिसत आहेत तर दुसऱ्या चित्रात ते कॅमेऱ्याकडे बघत हसत आहेत.
केएल राहुलने फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॅपी बर्थडे माय (लव्ह इमोजी) @ अथियाशेट्टी.’ ज्याला सध्या १.९ दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत. अथिया आणि राहुल अनेकदा एकत्र दिसतात. जरी दोघांनी नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगले असले तरीदेखील ते नेहमीच एकत्र दिसत असल्याने त्यांच्या प्रेमाची चर्चा होत आहे.
कालच्या सामन्यात केएल राहुलने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत उत्तम खेळी दाखवली. त्यामुळे सध्या केएल राहुल खूप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या चित्रपटात दिसली होती
अथिया शेट्टी पडद्यावर नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘मोतीचूर चकनाचूर’ चित्रपटामध्ये दिसली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम