‘त्या’ महिलांची हवाई सफारी, एक असाही महिला दीन

0
41
जागतिक महिला दिनानिमित्त विमानाने हैदराबाद मोफत सहल संपन्न करून आल्यावर येथील देवी मंदिरात आलेल्या सदर महिला समवेत प्रवासीमित्र डॉ.अहिरराव.(छाया-सोमनाथ जगताप )

देवळा : लेखन-भाषणातील महिलादिन सर्वत्र साजरा होत असताना देवळा येथील हौसमौजपासून वंचित असणाऱ्या अकरा महिलांना थेट विमानाने मोफत हैदराबाद टूर घडवून आणत देवळेकरांनी खऱ्या अर्थाने कृतिशील महिलादिन साजरा केला.

वादळी वारा मेघगर्जनेसह अवकाळी पाऊसाने शेतकरी मेटाकुटीला

जागतिक महिला दिनानिमित्त विमानाने हैदराबाद मोफत सहल संपन्न करून आल्यावर येथील देवी मंदिरात आलेल्या सदर महिला समवेत प्रवासीमित्र डॉ.अहिरराव.(छाया-सोमनाथ जगताप )

या सर्व महिला चार दिवसीय सहल पूर्ण करून जेव्हा मंगळवारी (दि .७) रोजी देवळा येथे परतल्या. त्यावेळी येथील देवी मंदिरात छोटेखानी कार्यक्रमात अनुभव व्यक्त करताना त्यांच्या भावनांचा बांध फुटला. देवळेकरांनी दिलेला हा अनोखा सन्मान आणि प्रेम आम्ही कधीच विसरणार नाही असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अमृतकार पतसंस्थेचे संस्थापक भारत कोठावदे, योगेश वाघमारे, सुनील आहेर, डॉ.राम अहिरराव, डॉ.शोभना अहिरराव उपस्थित होते. भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्यासह येथील प्रायोजकांचे याकामी सहकार्य लाभले.अशा प्रकारे महिलासन्मानाचा हटके उपक्रम राबविण्यात आल्याने जिल्ह्यात हा कौतुकाचा विषय ठरला.

देवळा शहर व तालुक्यातील धुणी-भांडी करणाऱ्या, आर्थिक दुर्बल-घटस्फोटीत-विधवा पण तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जीवनाची लढाई जिंकणाऱ्या महिला तसेच सफाई कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी मदतनीस, शेतमजूर अशा ११ महिलांचा यात समावेश होता. हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी, बिर्ला मंदिर, गोवळकोंडा किल्ला, चार मिनार, विविध म्युझियम्स व इतरही अनेक ठिकाणी ही सहल घडवून आणली. प्रवासीमित्र डॉ.जयेश अहिरराव यांनी या महिलांसोबत जात खास प्रकारे संयोजन केले.

या उपक्रमासाठी भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्यासह पुढील प्रायोजकांचे सहकार्य लाभले : प्रवासीमित्र डॉ.अहिरराव, नंदकुमार जाधव ज्वेलर्स, बाडमेर स्वीट्स, माऊली ग्राफिक्स, सुदर्शन सोलर देवळा, संजय आहेर बिल्डर्स अमेरिका, नगरसेविका भाग्यश्री पवार, वडनेरे ज्वेलर्स, गायत्री रेडीमेट्स, अर्बन साईट्स नाशिक, दुर्गा मंडप, नेहा फोटो, राजेंद्र अहिरराव, सौभाग्य स्टोअर्स, अस्मि इन्शुरन्स, शुभम मंडप, कौतिक पवार, ओम गुरुदेव आय केअर, सतीश गुंजाळ

“आगामी काळात महिलांचा सन्मान करण्याचे नवनवीन उपक्रम घेतले जाणार आहेत, त्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचे अनमोल सहकार्य आम्हास बळ पुरवत असते.”
_ भारत कोठावदे, देवळा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here