देवळा: तालुक्यातील खर्डे येथील हनी बनी इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. गेल्या पाच वर्षापासून ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी देखील स्नेसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
नवोदित अभिनेता सूरज कुमार तसेच अभिनेत्री निवेदिता पगार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी युवा नेते संभाजी आहेर , निवृत्त अधिकारी शिरीष जाधव, माजी सभापती कृ. उ.बा.समिती बापू देवरे, संचालक किरण जाधव, तोसिफ सय्यद, प्राचार्य वैशाली जाधव ,भूवनेश्र्वरी दिक्षित, मिताली जाधव, संध्या देवरे, पूजा चव्हाण, अनिता निरभवणे, केदारे मॅडम, मानसी जाधव, समवेत स्टाफ संदीप खरे, देविदास कुवर, सिमा जगताप, वसंत जाधव, सुरेश जाधव, यशवंत देवरे, भिका जाधव, सोमनाथ जगताप, हर्षद मोरे, राहुल देवरे, मुन्ना शिंदे, स्वराज्य ग्रुपचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाचे तिसरे वर्ष असून CSC Olympiad परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र , SBI Life Drawing Competation सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र वाटप, तसेच प्रत्येक वर्गातील एक Students Of Year Medals देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात एक स्पर्धा निर्माण होवून प्रत्येक विद्यार्थी मेडल मिळविण्यासाठी अभ्यासात स्पर्धा करून जगाच्या स्पर्धेत खरा उतरेल असे मत संस्थेचे संचालक जाधव यांनी व्यक्त केले.
यास्नेह संमेलनावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिमुरड्यांनी आपली कला सादर केली मात्र येथील स्टाफने देखील आपला नृत्यआविष्कार सादर करत कार्यक्रमात चार चाँद लावल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या कौतुकाने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत स्वागत केले
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम