Pathaan Box Office Collection: पठाणने मारली बाजी, शाहरुख खान 4 वर्षांनंतर पुन्हा ठरला किंग

0
28

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी करताना दिसतोय. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले.

विशेष म्हणजे अजून पठाण चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये बघायला मिळत आहे. पठाणच्या चित्रपट निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत चित्रपटाच्या तिकिट दरामध्ये मोठी कपात केलीये.

पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक बाॅलिवूड चित्रपटांचे रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत.

Onion farmers are aggressive : इच्छा मरणाची परवानगी द्या, चांदवडच्या 101 शेतकऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

नुकताच पठाण चित्रपटाने बाहुबली 2 चा रेकाॅर्ड बॉक्स ऑफिसवर तोडला आहे. आता सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण हा ठरला आहे. प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकत एक इतिहास पठाण चित्रपटाने लिहिलाय.

शुक्रवारी पठाण चित्रपटाने 1.20 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here