तालुक्यांतील अवैध धंद्यांवर टाच; API शिरसाठांच्या कामगिरीने अवैध धंदे चालकांना घाम

0
37
तालुक्यातील उमराणे परीसरात गावठी दारू हातभट्टी उध्वस्त करतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ व पथक (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा: देवळा तालुक्यातील गावठी हातभट्टीनवर देवळा पोलिसांचा पुन्हा छापा संबंधितांचे धाबे दणाणले. गेल्या काही दिवसांपासून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंद्यांवर छापेमारी सुरू असून त्यात देवळा तालुक्यातही छापेमारी सुरू असून त्यातच गावठी हातभट्टया उद्धवस्त करण्याचे काम देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ आणि त्यांच्या टीमकडून जोरदार सुरू आहे.

HSC Exam 2023: इंग्रजीच्या पेपरमध्ये मिळणार अतिरिक्त 6 गुण ; मात्र या आहेत अटी

तालुक्यातील उमराणे परीसरात गावठी दारू हातभट्टी उध्वस्त करतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ व पथक (छाया – सोमनाथ जगताप)

काल तालुक्यातील कांद्याची मोठी बाजारपेठ आणि जास्त लोकसंख्या असलेल्या उमराणे परिसरात मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टया उध्वस्त करत गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे लाखो रुपयांचे रसायन सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ आणि त्यांच्या टीमकडून नष्ट करण्यात आले. तालुक्यातील खास करून ग्रामीण भागात दररोज कुठल्या ना कुठल्या तरी गावात ही कारवाई होत असल्याने सर्वसामान्य जनतेने याबाबत देवळा पोलिसांकडून होणाऱ्या या कारवाईचे स्वागत केले आहे. एक तर ग्रामीण भागात नोकरी मिळत नाही म्हणून आधीच नशिबाला वैतागलेला तरुण वर्ग ,सध्या शेती व्यवसायाला आलेले वाईट दिवस त्यामुळे नैराश्य येत अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण व्यसनाधीन होतांना दिसत आहे. आणि त्यातच ही गावठी हातभट्टीची दारू गावात सहज आणि स्वस्तात उपलब्ध होत असल्याने दिवसेंदिवस तरुण वर्ग व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढत आहे.

यातच घरातील थोरामोठ्यांचे हे जे व्यसनाधीन तरुण आहेत ते कोणाचे न ऐकता नशा करून आले की घरात मोठ्या प्रमाणावर भांडणे देखील होतांना दिसत आहेत या भांडण अनेकदा विकोपाला जाऊन त्यात एखादी बरी वाईट घटना घडल्याचे देखील समाजात उदाहरणे आहेत या समाजविघातक गोष्टींना कुठे तरी आळा बसावा यासाठी तालुकाभर गावठी हातभट्टीनवर देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्याकडून होत असलेल्या कारवाईचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत होत असून शिरसाठ यांनी हे अवैध धंदे तालुक्यात चालू देणार नसल्याची जणू काही शपथच घेतली आहे. ग्रामीण भागात नशेच्या आहारी जाऊन अनेक आयाबहिणींचे संसार उध्वस्त झाले आहेत तर काहींचे उध्वस्त होण्याच्या मार्गावर होते त्यामुळे शिरसाठ यांनी केलेल्या या कारवाई बाबत अनेक सुजाण नागरिकांनी शिरसाठ यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत कारवाई सुरूच ठेवावी अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहेत. याआधी देखील अवैध रेती,गुटखा,वाघाची कातडी तस्कर विरुद्ध कार्यवाह्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ आणि त्यांच्या टीमने केल्या आहेत.

जोपर्यंत देवळा तालुक्यातील जनतेची सेवा करत राहील तोपर्यंत तालुक्यात कुठलेही अवैध धंदे चालू देणार नाही तसे करण्याचा एखाद्याने प्रयत्न केल्यास त्याला पोलीस कारवाईस सामोरे जावेच लागेल.
पुरुषोत्तम शिरसाठ ,सहाय्यक पोलीस निरीक्षक देवळा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here