Technology News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आवाहन केल्यानुसार पर्यावरण पूरक आणि परकीय चलन वाचवणाऱ्या इंधनाच्या संशोधनात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. बॅटरी किंवा विद्युत घटांवर चालणाऱ्या बस गाड्या आता सर्वच महापालिका क्षेत्रात दिसू लागल्या आहेत. आता तर थेट हायड्रोजनवर चालणाऱ्या आणि धूरा ऐवजी पाण्याचे उत्सर्जन करणाऱ्या बसेस लवकरच सार्वजनिक वाहतुकीत मोठी क्रांती घडवणार आहेत. महत्वाचे म्हणजे यामूळे देशाचे हायड्रोकार्बन म्हणजेच कार्बन इंधन आयात करण्यासाठी लागणारे बहुमुल्य परकिय चलन वाचणार आहे.
Banks Week : दुसरा की तिसरा शनिवार? बँकेत जाऊ की नको, ग्राहकांचा हेडॅक असा होणार कमी
मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ची उपकंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) ने सार्वजनिक वाहतूकीतले आपले नेतुत्व पून्हा एकदा अधोरेखीत केलं आहे. पुढील पिढीची वाहतूक व्यवस्था ठरणाऱ्या नवीन तंत्रज्ञानावर आधारलेल्या हायड्रोजन बसेसचे लवकरच भारतीय बाजारपेठ आगमन होणार आहे . रिलायन्ससोबत तांत्रिक सहकार्याने हायड्रोजन बसची घोषणा ऑलेक्ट्राने केली आहे.
पारंपारिक सार्वजनिक वाहतुकीला संपुर्ण कार्बनमुक्त पर्याय म्हणजे हायड्रोजन बस. वायु, जल प्रदुषणाला आळा घालणाऱ्या हायड्रोजनवर चालणाऱ्या या बसेस ऑलेक्ट्राच्या कारखान्यात तयार होणार आहेत. या उपक्रमामुळे भारत सरकारच्या कार्बनमुक्त हायड्रोजन इंधनाच्या महत्त्वाकांक्षी मोहीमेला बळ मिळेल.
12-मीटरच्या लो-फ्लोअर बसमध्ये प्रवाशांसाठी 32 पासून 49 आसनाची सोय असणार आहे. या व्यतिरिक्त एक ड्रायव्हरचे आसन अशी एकूण आसन क्षमता असेल. एकदा हायड्रोजनची टाकी फुल्ल केल्यानंतर बस 400 किमी पर्यंत प्रवास करू शकेल. या प्रवासाला लागणारा हॉयड्रोजन वायू भरायला फक्त 15 मिनीटे लागतात.
डिझेल पेट्रोल सारखे कार्बन इंधन वापरणाऱ्या पारंपारिक बसेसच्या उत्सर्जनाचा विचार केला तर या बसेस फक्त पाणी उत्सर्जीत करतात. जुन्या डिझेल आणि पेट्रोल वर चालणाऱ्या बसेस टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक बसेसमध्ये परावर्तित करण्याच्या केंद्र सरकारच्या महात्वाकांक्षी योजनेला यामूळे चालना मिळेल.
Banks Week : दुसरा की तिसरा शनिवार? बँकेत जाऊ की नको, ग्राहकांचा हेडॅक असा होणार कमी
या बसेसमध्ये वरच्या बाजूला टाइप-4 हायड्रोजन सिलिंडर बसवलेले असतात. हे सिलिंडर -20 ते +85 अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकतात.येत्या वर्षात या बसेस व्यवसायिक वापरसाठी उपलब्ध करून देण्याचे ऑलेक्ट्राचे उद्दिष्ट आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम