Petrol Diesel Price : कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार, मात्र ग्राहकांना दिलासा नाहीच

0
19

भारतात प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलचा भाव अद्ययावत करण्यात येतात. सरकारी तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर करतात. हे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतींनुसार बदलतात. क्रूड ऑईलच्या किंमतींचा पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर (Petrol Diesel Price) परिणाम होतो. मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी, 1 मार्च, 2023 रोजी क्रूड ऑईलच्या (Crude Oil Price) किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला अनेक वस्तूंचे दाम वाढले आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. सध्या पेट्रोल-डिझेलवरील कर कपातीचा मुद्दा गरम आहे. क्रूड ऑईलच्या किंमती घसरल्याने तुमच्या खिशावरील दरवाढीचा भार कमी होईल का?

Petrol Diesel Price कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार, तुमच्या खिशावरील कमडिझेलचा भाव अद्ययावत करण्यात येतात. सरकारी तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर करतात. हे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतींनुसार बदलतात. क्रूड ऑईलच्या किंमतींचा पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर (Petrol Diesel Price) परिणाम होतो. मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी, 1 मार्च, 2023 रोजी क्रूड ऑईलच्या (Crude Oil Price) किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला अनेक वस्तूंचे दाम वाढले आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. सध्या पेट्रोल-डिझेलवरील कर कपातीचा मुद्दा गरम आहे. क्रूड ऑईलच्या किंमती घसरल्याने तुमच्या खिशावरील दरवाढीचा भार कमी होईल का?

आज डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 0.62 टक्क्यांची घसरण होऊन किंमत 76.57 डॉलर प्रति बॅरलवर पोहचली. तर 1.75 टक्क्यांची वाढ होऊन 83.89 डॉलर प्रति बॅरलवर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) व्यापार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार होत असली तरी वर्षभरात मात्र या किंमती 15 टक्क्यांनी घसरल्या आहेत. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

Health Tips : काय सांगता? दररोज फक्त 11 मिनिटे नियमित चाला, मृत्यूला टाळा; संशोधन असे की…

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here