सोना महापात्रा हिने केले शहनाज गिल हिच्याबद्दल वादग्रस्त ट्विट, यशस्वी पुरुषांच्या मागे धावणे आणि

0
23

शहनाज गिल हिला खरी ओळख बिग बाॅस 13 मधून मिळालीये. सिध्दार्थ शुक्ला आणि शहनाज गिलच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. बिग बाॅसमध्ये सहभागी होण्याच्या अगोदर शहनाज गिल हिची फॅन फाॅलोइंग फक्त पंजाबमध्येच होती. आता सर्व भारतामध्ये शहनाज गिल हिचे चाहते आहेत.

शहनाज गिल ही सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान या चित्रपटामधून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात आहेत.

Shiv Sena Yatra : ‘शिव संवादला’ शिंदे देणार ‘शिव धनुष्य’ यात्रेने उत्तर ; ठाकरे शिंदे संघर्ष पुन्हा पेटणार

शहनाज गिल हिला थेट बाॅलिवूड चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तेही सलमान खान याच्यासोबत यामुळे अनेकांना हे पचनी पडले नसून काही लोकांनी शहनाज गिल हिला टार्गेट करण्यास सुरूवात केलीये.

सोना मोहापात्रा हिने काही दिवसांपूर्वी शहनाज गिल हिला टार्गेट करत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. आताही सोना मोहापात्रा हिने शहनाज गिल हिच्याबद्दल एक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सोना माहापात्राने ट्विट केले की, काही पैसे खर्च करा, काहीतरी शिकण्यासाठी वेळ आणि मेहनत करा, मग तो संगीत शिक्षक असो किंवा अभिनय प्रशिक्षक…व्हॉइस डायलॉग्स शिकण्यासाठी सराव देखील करा.. जे तुम्हाला तुमची प्रतिभा सांगले. यशस्वी पुरुषांच्या मागे धावणे, पीआर खरेदी करणे हे यश नाही…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here