ताहाराबाद येथील निराधार महिलांना भाऊबीजेची भेट

0
196

ताहाराबाद प्रतिनिधी (रोहित गुरव) ; ताहाराबाद येथील सगरवंशीय बहुउद्देशीय मित्र मंडळातर्फे नुकतेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निराधार, अपंग वृद्ध महिलांना भाऊबीजेची एक भेट देण्यात आली.

सर्व निराधार, गरजू महिलांना साड्यांचे वाटप मंडळातर्फे करण्यात आले. माजी सरपंच काशिनाथ बापूजी यांच्या हस्ते साड्यांचे वाटप पार पडले.

दिवाळीच्या काळात सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून येत असतो. त्या प्रकारे या गरीब, निराधार महिलांची देखील दिवाळी आनंदात जावी या उद्देशाने ताहाराबद येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी नव्या उपक्रमांतर्गत 40 साड्यांचे घरोघरी जाऊन वाटप केले.

मंडळाचे कार्यकर्ते गजानन साळवे, प्रशांत महाजन, मनोहर नंदन, भाऊ नंदन, सागर मानकर, वैभव नंदन, पुंडलिक नंदन, अशोक नंदन अशा सर्वांनी परिश्रम घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here