Shiv Sena Yatra : ‘शिव संवादला’ शिंदे देणार ‘शिव धनुष्य’ यात्रेने उत्तर ; ठाकरे शिंदे संघर्ष पुन्हा पेटणार

0
41

Shiv Sena Yatra : राज्यात सत्ता संघर्षानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून पक्षाचे चिन्ह आणि नाव ठाकरेंच्या हातून गेल्याननंत ठाकरे गटाने राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद (Shiv Samvad) नावाने अभियान राज्यभरात सुरु झाले आहे. उद्धव ठाकरेंच्या आदेशाने सुरू झालेल्या ठाकरे गटाच्या या शिवसंवाद आणि शिवगर्जना यात्रेला शिंदेनी शिवधनुष्य यात्रेने उत्तर देण्याचे ठरविले आहे. लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेची (एकनाथ शिंदे ) शिवधनुष्य यात्रा सुरु होणार आहे. यामुळे शिंदे ठाकरे संघर्ष पुनः पेटण्याची चिन्हे आहेत. (Shiv Sena Yatra)

https://thepointnow.in/weather-1-march/

महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेना उत्तर देण्यासाठी कार्यक्रम आखला असून शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगने दिल्या नंतर दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात शब्द युद्ध सुर आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेला धनुष्यबाण त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणार आहे. तसेच मार्च अखेरीस अयोध्यावारी करण्याबाबत शिवसेना (शिंदे गटाची) आखणी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. अयोध्येतून धनुष्यबाण आणून तो यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवणार आहे. ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण’ असे या यात्रेचे घोषवाक्य असणार असल्याची माहिती आहे.

शिंदे विविध भागात करणार दौरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवधनुष्य यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात दौरे करण्यावर भर देण्यात असून यासाठी टीम देखील करण्यात येणार आहे. अभियानाची जबाबदारी निष्ठावान नेत्यांवर सोपवण्यात येणार असून शिवसेनेचे नेते या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दौरा करतील आम्हीच खरी शिवसेना असल्याचे या यात्रेच्या माध्यमातून जनतेला सांगण्यात येणार आहे.

शिवसेनेचा अयोध्या दौरा
मुख्यमंत्री शिंदे यांनी मास्टरप्लॅन केला असून शिंदे पुढच्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. या अयोध्या दौऱ्यात सर्व मंत्री आणि आमदार सहभागी होणार आहेत. एकनाथ शिंदे यांना अयोध्येतील महंत धनुष्यबाण भेट देणार असून हेच धनुष्यबाण शिंदे गटाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये फिरवलं जाणार आहे यातून मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मितीचा प्लॅन आहे.

उद्धव ठाकरे गटाचा शिवसंवाद
उद्धव ठाकरे गटाची 25 फेब्रुवारीपासून राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद (Shiv Samvad) अभियान सुरु झाले असून 25 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान हे अभियान सुरु राहील. शिवगर्जना अभियानामार्फत राज्यभरात पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागांचा दौरा करत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना नेते सुभाष देसाई, खा. संजय राऊत, खा. अरविंद सावंत, खासदार ओमराजे निंबळाकर, खासदार प्रियांका चतुर्वेदी, अनंत गीते, चंद्राकांत खैरे, नितीन बानगुडे पाटील या नेत्यांसह काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियानाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here