Mumbai Police Alert: ‘सरफराज मेमन मुंबईत पोहोचला, चीन, पाकिस्तानमध्ये घेतली ट्रेनिंग’, NIA चा पोलिसांना इशारा

0
41

Mumbai Police Alert: राज्यात पुन्हा घातपात घडवण्याचा कट असल्याचे समोर आले आहे. यामुळे यंत्रणेनेची काळजी वाढली असून अलर्ट मोडवर सर्व यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मुंबई पोलिसांना सतर्क (mumbai police alert) केले आहे. एनआयएने ईमेलवर मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याची माहिती दिली आणि मुंबईत एक धोकादायक व्यक्ती फिरत असल्याचे सांगितले. हा ईमेल मिळाल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाली आहे.

Vidhimandal Adhiveshan: विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; शिवसेनेच्या दोन गटांमध्ये संघर्षाची शक्यता

एनआयएने आपल्या ईमेलमध्ये ‘धोकादायक’ शब्दाचा उल्लेख करत मुंबई पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सूत्रांनी सांगितले की, एनआयएने आपल्या ईमेलमध्ये संशयिताचे नाव सरफराज मेमन असे नमूद केले असून तो मुंबईला पोहोचल्याचे सांगितले आहे.

इंदूर पोलिसांनाही सतर्क करण्यात आले
एनआयएने सांगितले की, हा व्यक्ती इंदूरचा रहिवासी आहे, त्याने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले आहे आणि तो भारतासाठी धोकादायक आहे. एनआयएने त्याचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि एलसी कॉपी मुंबई पोलिसांना ईमेलवर पाठवली आहे. मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांनाही याबाबत माहिती दिली आहे.

Manish Sisodia Arrested: ‘केंद्र आवाज दाबत आहे, आम्ही सिसोदिया यांच्या पाठीशी उभे राहू’, संजय राऊत

काही दिवसांपूर्वी एक ईमेल आला होता
3 फेब्रुवारी रोजी, राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) एका अज्ञात व्यक्तीकडून एक ईमेल प्राप्त झाला, ज्यात तालिबानचा सदस्य असल्याचा दावा करून, मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी एनआयएने मुंबई पोलिसांसह संयुक्त तपास सुरू केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, केंद्रीय तपास यंत्रणेने मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक शहरांना अलर्टवर ठेवण्यात आले.

देवळ्यात तब्बल ३७ वर्षांनी भरली शाळा ; माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या ई-मेल आयडीवर धमकीचा मेल आला होता, ज्यामध्ये शहरात दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. ईमेल पाठवणार्‍याने स्वतःची ओळख तालिबानी म्हणून केली आणि तालिबानचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या सांगण्यावरून हे केले जात असल्याचा दावा केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here