Ajit pawar : शिंदे चहात सोन्याचे पाणी घालतात का? 2.38 कोटींवर येणार्‍या चहाच्या बिलावर पवारांचा सवाल

0
47

Ajit pawar : महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (२७ फेब्रुवारी, सोमवार) सुरू होत आहे. तत्पूर्वी, परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना चहापानाचे निमंत्रण दिले. विरोधकांनी चहा पिण्यावर बहिष्कार टाकला. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार तर टाकलाच, पण विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यातील चहापानाच्या बिलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात गेल्या चार महिन्यांत 2 कोटी 38 लाख रुपयांचे बिल आले आहे. इतके बिल?

Ajit pawar: ‘शेतकरी त्रस्त आणि शिंदे सरकार मस्त’, अजित पवारांचा हल्लाबोल

अजित पवार म्हणाले, मी उपमुख्यमंत्रीही झालो आहे. इतर लोकही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री झाले आहेत. खाण्यापिण्याचे असे बिल कधीच आले नव्हते. तुम्ही चहात सोन्याचा अर्क घालता का? शिंदे-फडणवीस यांच्या शिवसेना-भाजप सरकारच्या जाहिरातींवर झालेल्या खर्चावरही अजित पवारांनी सवाल उपस्थित केला आहे.

अजित पवार नेहमीच आपल्या शैलीने प्रचलित असतात आज अजितदादांनी मिश्किल टिप्पणी करत या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे. इतके बिल कसे झाले यावर सोशल मीडियावर चर्चांना ऊत आली आहे. उद्यापासून सुरु होणारे अधिवेशन वादळी ठरणार यात मात्र कसलीही शंका नाही. मोठ्या प्रमाणात झालेल्या बंडखोरीनंतर हे अधिवेशन महत्वाचे असणार आहे. ठाकरे गट देखील आमने सामने येणार असून यामुळे सर्वांचे लक्ष हे मुंबईकडे लागले असून जनतेच्या हिताचे निर्णय काय होता हे देखील बघणे महत्वाचे आहे.

दीपिका सारखा हवाय फिटनेस तर करा हे फॉलो


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here