कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्या – आ. आहेर

0
18
मुंबई - कांद्याला पाचशे रुपये विशेष अर्थसहाय्य अनुदान देण्यात यावे या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देतांना आमदार डॉ राहुल आहेर (छाया -सोमनाथ जगताप)

देवळा : लाल कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प भावामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या पार्श्वभूमीवर या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५०० रु. विशेष अर्थसहाय्य अनुदान देण्यात यावे अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. बुधवार (दि .२२) रोजी भेट घेत तसे निवेदन दिले.

मुंबई कांद्याला पाचशे रुपये विशेष अर्थसहाय्य अनुदान देण्यात यावे या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देतांना आमदार डॉ राहुल आहेर छाया सोमनाथ जगताप

देवळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
निवेदनाचा आशय असा की, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हा कांदा उत्पादक आहे. मात्र सध्या विक्री होत असलेल्या लाल कांद्यास केवळ ५०० ते ७०० रु.प्रति क्विंटल भाव मिळत आहे. वाढते उत्पादन, परदेशी बाजारपेठांमध्ये बिघडलेली आर्थिक स्थिती, रशिया-युक्रेन युद्ध यामुळे कांद्याचे भाव घसरत असले तरी त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. केंद्र व राज्यशासन शेतकऱ्यांप्रति सकारात्मक असून त्यासाठी निर्यात धोरण, नाफेड कांदा खरेदी व इतर मार्ग अवलंबिले जात आहेत. मात्र असे असले तरी सद्यस्थितीत कांद्याचे बाजारभाव अत्यंत कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५०० रु. आर्थिक मदत देत त्यांना सहाय्य करावे व कांदा बाजारभावात सुधारणा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here