द पॉईंट नाऊ प्रतिनिधी :दिवाळीच्या काळात केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना एक भेट दिली आहे. ज्यात आता पेट्रोल 5 रुपयांनी आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्र सरकारने एकसाईज ड्युटी कमी केल्याने आता पेट्रोल-डिझेल चे नवीन दर 4 नोव्हेंबर पासून लागू झाले आहेत.
केंद्र सरकारने दर कमी केल्यानंतर महाराष्ट्रात देखील दर अजून कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे पेट्रोल एकूण 6 रुपये, तर डिझेल 12 रुपयांनी स्वस्त होऊ शकते, असे बोलले जात आहे.
केंद्र सरकारने अचानकच हा निर्णय घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मात्र, स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला बसलेल्या धक्क्यांमुळे तर केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय अशी चर्चा देखील झडू लागली आहे.
सामान्यांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त केला जात असला, तरी दर जोवर 80-90 च्या जवळ येत नाहीत, तोवर म्हणावा तसा काही फरक पडणार नाही असे मत सामान्य व्यक्त करताय.
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता राज्य सरकार देखील काही निर्णय घेते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम