देवळा: पोलीस अधिक्षक शहाजी उमप यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक नाशिक ग्रा.माधुरी कांगणे , अपर पोलीस अधिक्षक मालेगांव अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेले गोपणीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहा पोलीस निरीक्षक सागर शिंपी , उदय पाठक , प्रशांत पाटील , शरद मोगल ,सुभाष चोपडा , योगेश कोळ ,दत्ता माळी आदींसह देवळा पोलीसांनी शुक्रवारी दि १७ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास राहूड घाटाचे पायथ्याशी तालुक्यातील चिंचवे शिवारात गुटखा वाहतूक करणारा मोठा कंटेनर मालासह पकडून दमदारी कामगीरी केली आहे .

अवैद्य गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर रात्री उशीरा महामार्गावरुन जाणार असल्याची माहिती मिळाली . त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच देवळा पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या चिंचवे शिवारात सापळा रचुन सदरचा गुटख्याची वाहतूक करणारा मोठा कंटेनर (क्रं . RJ – 14 / GL 6143) हा ताब्यात घेतला आहे .त्यावळी कंटेनर चालकाने कंटेनर मधून उडी मारुन पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला . परंतू पोलीसांनी शिताफीने पाठलाग करुन कंटेनर चालक सददाम शहजाद खान रा . साहबनगर मथुरा उ.प्रदेश यास ताब्यात घेतले . त्यावेळी कंटेनरमध्ये गुटख्याच्या एकूण १४७ मोठया थैल्या ठेवल्या असल्याचे दिसून आले .
सदर थैल्यांची बाजारभावाप्रमाणे एकूण किम्मत ८७लाख ४६ हजार ३८० / -रु . एवढी असल्याचे पोलीसांनी सांगीतले . सदरवेळी कंटेनर चालक सददाम शहजाद खान रा . साहबनगर मथुरा उ . प्रदेश यास ताब्यात घेण्यात आले असून पोलीसांनी कंटेनरसह एकूण २०७४६३८० / -रु.चा मुददेमाल जप्त केलेला आहे . . देवळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून ,सदर गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे .याकामी मालेगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शरद मोगल,सुभाष चोपडा,पोलीस अमलदार दत्ता माळी योगेश कोळ, देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक विक्रांत कचरे,विनय देवरे,ज्योती गोसावी, सचिन भामरे आदींनी विशेष कामगिरी बजावली .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम