
देवळा : देवळा मालेगाव रोडवर खुंटेवाडी फाटा येथे बुधवार दि १५ रोजी मोटार सायकल व वाळुचा ट्रॅक्टर यात अपघात होऊन दुचाकी स्वार युवक जागीच ठार झाला असून ,दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे .

या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या बाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि , बुधवार दि १५ रोजी दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास देवळा मालेगांव रोडवरील खुंटेवाडी फाटयावर ट्रॅक्टर( क्रं . MH – 15 / D0-5309 )हा खुंटेवाडी गावाकडून वाखारवाडीच्या दिशेने वाळू भरून घेऊन जात असतांना मागून येणारा मोटार सायलक स्वार राकेश अनील ठाकरे (२०) रा . दहीवड ता देवळा ( क्रं . MH – 01 / Q – 7266) हा ट्रॅक्टरवर जावून आदळला.
या अपघातात राकेश अनील ठाकरे याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. तर त्याच्या पाठीमागे बसलेला युवक भुषण धना माळी रा खर्डे ता देवळा हा गंभीर जखमी झाला असून ,त्याला पुढील उपचारार्थ नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याठिकाणी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात होऊन एक ठार तर एक गंभीर जखमी झाला असून, जो पर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
खुंटेवाडी फाटा, बस स्टॉप समोर, खुंटेवाडी येथील देवळा-मालेगाव रोडवर, वैभव दिनकर आहेर रा. वाखारी हा त्याचे ताब्यातील स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रं. MH.15 DU.5309 हा ट्रॉलीमध्ये वाळू भरुन खुंटेवाडी फाटयावर खुंटेवाडी गावाकडून वाखारवाडी दिशेने घेवून जात होता. अत्यंत भरधाव वेगाने निष्काळजीपणाने रस्ता ओलांडत असतांना, देवळा मालेगांव रोडवरुन पिंपळगांव बाजूकडून देवळा दिशेने जाणारी मोटार सायकल क्रं. MH.01 Q.7266 यांच्यात अपघात झाला. या अपघातात मोटारसायकल स्वार राकेश अनील ठाकरे (वय २०) रा. दहीवड ता. देवळा हा ठार झाला तर भुषण धना माळी (वय १९) रा. खर्डे ता. देवळा हा गंभीर जखमी झाला. सदर अपघाताची खबर न देता पळून गेलेल्या आरोपीस पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ठार झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांची दि. १५ रोजी दिवसभर देवळा पोलीस ठाण्यात वर्दळ सुरू होती. दरम्यान पो.उप.निरीक्षक महेश शिंदे व मृत तरुणांच्या नातेवाईक यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे मृताच्या नातेवाईकांनी सांगत दि. १५ रोजी मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध दर्शविल्याने काल मृत तरुणावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. दि.१६ रोजी मृत तरुणांच्या नातेवाईकांनी आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी सकाळी पोलीस ठाण्यासमोर समाज बांधवानी ठिया आंदोलन केले. यावेळी सहा. पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ व तहसीलदार विजय सुर्यवंशी यांनी नातेवाईकांची समजुत काढत आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन मृताच्या दहिवड या मूळ गावी आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघातानंतर पोलीस ठाण्यात गेलेल्या मृत तरुणाच्या नातेवाईकांना पो.उप.निरीक्षक महेश शिंदे यांनी तुमच्यावर प्रेताची विटंबना केली म्हणून व खंडणीचा गुन्हा दाखल करू अशी दमबाजी करत भावना दुखावल्या. त्यामुळे शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करा
– सुभाष सोनवणे (सामाजिक कार्यकर्ते, उमराणे)
अवैद्य वाळू वाहतुकीमुळे आज एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला असल्याने, ज्या कार्यक्षेत्रात हा ट्रॅक्टर अवैद्य रित्या वाळू वाहतूक करत होता, तेथील तलाठी व सर्कल यांना सह आरोपी करण्यात यावे. आपत्ती व्यवस्थापन निधीतून मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी
–दिलीप बर्डे ( अध्यक्ष, विद्रोही आदिवासी महासंघ)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम