आली दिवाळी दिवाळी
आला आनंदाचा सण
माझा शेतकरी बाप
त्याची आहे वणवणपीक विकून घेऊया
म्हणे दिवाळी बाजार
पीक विकलं विकलं
झाले रुपये हजारबाप हजार रुपये
पुन्हा पुन्हा पाहतोय
नाही सुखाची दिवाळी
आसवात नहातोयबाप जगाचा पोशिंदा
घेई किलोची साखर
पहा काय दशा त्याची
ज्याचा बीघ्याचा आखरसार्या पिकांचेच भाव
घसरून खाली आले
सरकार दरबारी
टीका टिपणीच चालेलोक सांगती बापाला
बीघा दीड बीघा विक
बाप म्हणे माती माय
तिला विकणे का ठीक..?
बाप म्हणे माती माय
तिला विकणे का ठीक..?काजल आहेर -शेलार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम