सोमनाथ जगताप
देवळा: खर्डे येथे बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले असून, सोमवारी दि१३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला चढवला. यात त्याने त्याचा फडशा पाडला. खर्डे ता देवळा येथील आवळे शिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून, त्याच्या ह्या दहशतीने पशुपालकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोमवारी रात्री या शिवारात राहणारे शेतकरी बापू विश्वनाथ सोनवणे यांच्या पाळीव कुत्र्याचा या बिबट्याने फडशा पाडला. तसेच रात्री कांद्याला पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यांवर त्यांने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग भयभीत झाले असून, याठिकाणी वन विभागाने पिंजरा लावून दिलासा द्यावा ,अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खर्डे व परिसरात बिबट्या चा वावर वाढला आहे.
पशुपालक संभ्रमात पडला असून,या गंभीर प्रश्नांकडे वन विभागाचे दुर्लक्ष असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. बापू सोनवणे यांचा पाळीव कुत्रा बिबट्याने ठार केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली .सद्या विजेच्या भारनियमन मुळे शेतकरी उन्हाळी कांद्याला रात्री पाणी भरण्यासाठी शेतात जात आहेत. त्यात बिबट्या च्या मुक्त संचाराने भीतीपोटी जाणे टाळत असल्याने दिवसा वीजपुरवठा व्हावा ,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम